सावरवाडी : गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे हरिनाम सप्ताह सोहळे बंद झाले. कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा यावर्षी वाढू लागल्याने माघवारी संपल्यानंतर सुरू होणारे ग्रामीण भागातील हरिनाम सप्ताह सोहळ्यावर पुन्हा कोरोनाचे सावट स्पष्ट होऊ लागले. हरिनाम सप्ताह सोहळ्यांना ग्रामीण भागात परवानगी मिळणार का नाही याबाबत वारकरीवर्गात द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागात माघवारी संपल्यानंतर सर्वत्र हरिनाम सप्ताह सोहळ्यांना प्रारंभ होतो. भजन, प्रवचन, हरिकीर्तन, सायुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, हरी पाठ, आदी धार्मिक कार्यक्रमांना गावागावांत गर्दी असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर, चा फज्जा उडालेला असतो. ग्रामदैवतांच्या मंदिर परिसरात गर्दी होत असते. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, प्रशासनाकडून धार्मिक कार्यक्रमांना आता मर्यादा येण्याची दाट शक्यता आहे. शिवाय अनेक कार्यक्रम रद्द करावे लागणार आहेत.
हरिनाम सप्ताह कमिटीकडून हरिनाम सप्ताह सोहळ्यातील अनेक कार्यक्रमांना कात्री लावण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात आषाढ, कार्तिक, माघ या तीन वाऱ्या तीर्थक्षेत्र पंढरपूर मंदिर बंद होते. त्यामुळे वारकऱ्यांना चंद्रभागा दर्शन घेऊन मायगावी परतावे लागले .
यंदाही ग्रामीण भागात सुरू होणारे हरिनाम सप्ताह सोहळ्यावर बंधने येण्याची शक्यता नाकारता येणार नाहीत.