या महासंघाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दि. १ ते ६ जूनदरम्यान कोरोना सुरक्षा सेवा सप्ताह साजरा केला जाणार आहे. त्याची सुरुवात मंगळवारी सीपीआर रुग्णालयातून करण्यात आली. या ठिकाणी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील आणि राज्य केमिस्टस असोसिएशनचे संघटन सचिव मदन पाटील यांच्या हस्ते सॅॅनिटायझर मशीन, सॅॅनिटायझर, सिरिंज, हातमोजे, मास्क हे सीपीआरचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुधीर करवते आणि आरोग्यदूत बंटी सावंत यांच्याकडे सुपुर्द केले.
यावेळी बबनराव रानगे, विजय आगरवाल, उत्तम जाधव, कादर मलबारी, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, मदन बागल, हेमंत घाग, महादेव पाटील, अवधूत पाटील, आदी उपस्थित होते. महापालिकेच्या रुग्णालयातही सिरिंज, सॅॅनिटायझर, हातमोजे, मास्कचे वाटप करण्यात आले. बालकल्याण संकुलात आज, बुधवारी दुपारी चार वाजता फळवाटप करण्यात येणार असल्याची माहिती अवधूत पाटील यांनी दिली.
चौकट
महोत्सव समितीचा दोन दिवसांत निर्णय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुर्गराज रायगड येथे रविवारी (दि. ६) शिवराज्याभिषेक सोहळा कशा पद्धतीने साजरा करावयाचा याबाबतचा निर्णय दोन दिवसांत जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी मंगळवारी दिली.
फोटो (०१०६२०२१-कोल-शिवराज्याभिषेक सप्ताह) : कोल्हापुरात मंगळवारी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन कोरोना सुरक्षा सेवा सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. सीपीआर रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुधीर करवते यांच्याकडे सॅॅॅनिटायझर, हातमाेजे, आदी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी सुपुर्द केले. यावेळी शेजारी बंटी सावंत, बाबा महाडिक, शंकरराव शेळके, कादर मलबारी, अवधूत पाटील, आदी उपस्थित होते.
===Photopath===
010621\01kol_3_01062021_5.jpg
===Caption===
फोटो (०१०६२०२१-कोल-शिवराज्याभिषेक सप्ताह) : कोल्हापुरात मंगळवारी अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन कोरोना सुरक्षा सेवा सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. सीपीआरचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुधीर करवते यांच्याकडे सॅॅॅनिटायझर, हँडग्लोज, आदी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी सुपूर्द केले. यावेळी शेजारी बंटी सावंत, बाबा महाडिक, शंकरराव शेळके, कादर मलबारी, अवधूत पाटील, आदी उपस्थित होते.