प्रारंभी, ग्रामविकास अधिकारी ए.एस. कठारे यांनी गावात कोरोना नियंत्रित ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी तहसीलदार उबाळे यांनी अलगीकरण केलेल्या कोरोना रुग्णांची दररोज चौकशी करून गरज भासत असेल, तर संबंधितांना पुढील उपचारासाठी पाठवावे. प्रतिबंधित आस्थापना बंदच ठेवाव्यात, तसेच अत्यावश्यक आस्थापना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून सुरू असल्याबाबत ग्रामपंचायतीने कटाक्ष ठेवावा, अशा सूचना दिल्या.
दरम्यान, कोरोना उपाययोजनेबाबत लागणाऱ्या सुविधांची उपलब्धता व्हावी, तसेच स्वतंत्र अलगीकरण कक्ष उभारण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदार उबाळे यांच्याकडे करण्यात आली. आढावा बैठकीस सरपंच माधुरी घोदे, उपसरपंच दाविद घाटगे, ग्रामविकास अधिकारी ए.एस. कठारे, ग्रा.पं. सदस्य, तलाठी संभाजी घाटगे, पोलीस पाटील महंमद पठाण आदींची उपस्थिती होती.