कोल्हापूर : रंकाळा टॉवर येथील रुग्णालयातील कोरोनाबाधित डॉक्टरांच्या संपर्कात प्रथम आणि दुय्यम असे ३२५ जण आले असून, त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. रंकाळा टॉवर, डांगे गल्लीचा काही परिसर सील केल्याने येथील व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा अनेकांच्या व्यवसायांना फटका बसला आहे.डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केले आहे. त्यांच्या दुय्यम संपर्कात आलेल्यांनाही १४ दिवस क्वारंटाईन होण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत. डांगे गल्ली येथील नरसोबा सेवा मंडळ येथील दोन गल्ली बॅरिकेड्स लावून सील केल्या आहेत. विशेषत: रंकाळा स्टँड ते रंकाळा टॉवर हा कोकणाला जोडणारा मुख्य मार्ग आहे. हा मार्गच बंद असल्यामुळे पर्यायी मार्गांवर वाहतुकीची कोंडी होत आहे.बँक, एटीएम बंदरुग्णालयासमोरच राष्ट्रीयीकृत बँक असून त्यांचे एटीएम सेंटरही आहे. या बँकेत नेहमी नागरिकांची गर्दी असते. या परिसरात नागरिकांना येण्यास प्रतिबंध केल्यामुळे बँकेने शाखा आणि एटीएम सेंटर बंद केले आहे. ग्राहकांना टिंबर मार्केट, दसरा चौक आणि साने गुरुजी शाखेतून व्यवहार करण्याचे फलक लावले आहे.व्यावसायिकांना फटकागेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे दुकाने बंद होती. लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे सायंकाळी पाच वाजेपर्यंत व्यवसाय सुरू होते. कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे दोन दिवसांपासून रंकाळा टॉवर येथील सर्व दुकाने बंद आहेत. यामुळे येथील व्यावसायिक अडचणीत सापडले आहे. याच मार्गावर अनेक हॉस्पिटलही असून त्यांच्यावरही याचा परिणाम झाला आहे.
CoronaVirus : डॉक्टरांच्या संपर्कातील ३२५ जण होम क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 3:38 PM
रंकाळा टॉवर येथील रुग्णालयातील कोरोनाबाधित डॉक्टरांच्या संपर्कात प्रथम आणि दुय्यम असे ३२५ जण आले असून, त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. रंकाळा टॉवर, डांगे गल्लीचा काही परिसर सील केल्याने येथील व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा अनेकांच्या व्यवसायांना फटका बसला आहे.
ठळक मुद्देडॉक्टरांच्या संपर्कातील ३२५ जण होम क्वारंटाईनरंकाळा टॉवर, डांगे गल्ली लॉक : परिसरातील अनेकांचे व्यवसाय बंद