शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
4
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
5
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
6
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
7
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
8
पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
9
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
10
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
11
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
13
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
14
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
15
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
16
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
17
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
18
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
20
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता

CoronaVirus : कोरोनाबाधित डॉक्टराच्या संपर्कातील ५९ जण निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 12:09 PM

नर्सिंग होममधील डॉक्टरपाठोपाठ महिला कर्मचाऱ्यासही कोरोना झाल्याने रंकाळा टॉवर परिसरात सोमवारी भीतीचे वातावरण कायम राहिले. कोरोनाबाधित डॉक्टराच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील अन्य एका रुग्णाच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेतला आहे. रंकाळा स्टँड ते रंकाळा टॉवर रस्ता सील केल्यामुळे पर्यायी मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली.

ठळक मुद्देकोरोनाबाधित डॉक्टराच्या संपर्कातील ५९ जण निगेटिव्हरंकाळा टॉवर परिसरात भिती कायम : पर्यायी मार्गावर वाहतूकीची कोंडी

कोल्हापूर : नर्सिंग होममधील डॉक्टरपाठोपाठ महिला कर्मचाऱ्यासही कोरोना झाल्याने रंकाळा टॉवर परिसरात सोमवारी भीतीचे वातावरण कायम राहिले. कोरोनाबाधित डॉक्टराच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील अन्य एका रुग्णाच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेतला आहे. रंकाळा स्टँड ते रंकाळा टॉवर रस्ता सील केल्यामुळे पर्यायी मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली.कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या डॉक्टरच्या संपर्कात आलेले कुटुंबीय, रुग्णालयातील कर्मचारी, घरातील कर्मचारी अशा ६० जणांचे अलगीकरण केले असून, त्यांच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी महिला कर्मचारी हिचा अहवाल पॉझिटिव्ह आला व इतरांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले. रुग्णालयासह सीपीआर, सावित्रीबाई फुले आणि एका खासगी रुग्णालयातील ६० जणांचा त्यामध्ये समावेश होता.परिसरातील व्यवहार ठप्परंकाळा स्टँड ते रंकाळा टॉवर हा मार्ग बॅरिकेड्‌स लावून बंद केला आहे. येथील सर्व दुकाने बंद आहेत. याच परिसरात राष्ट्रीयीकृत बँक असून त्यांनी शाखेसह एटीएम सेंटरही बंद ठेवले आहे. व्यावसायिकांचे नुकसान होत असून परिसरातील नागरिकांनाही जीवनावश्यक वस्तूसाठी त्रास होत आहे.रुग्णालयात प्रवेश बंदकोरोनाबाधित डॉक्टरच्या रुग्णालयात सहा रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या जेवणाची सोय रुग्णालयाकडून करण्यात आली असून, कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही. रुग्णालयामध्ये सिस्टर, कंपाऊंडर, वॉचमन आणि चालक असे चार कर्मचारी उपचारासाठी आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर