कोल्हापूर : रेडझोनमधून येणाऱ्यांमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने रेडझोनसह इतर जिल्हे व राज्यांतून येणाऱ्यांना प्रवेश देण्याबात नियोजन केले आहे. त्यानुसार मंगळवारपासून ३१ मेपर्यंत ९ हजार ३०० जणांना प्रवेश दिला जाणार आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.याबाबतची पत्रे त्यांनी ठाणे, पुणे, पालघर, रायगड, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांना तसेच मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, सोलापूर येथील पोलीस आयुक्तांना पाठविले आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४००वर गेली आहे. त्यामध्ये रेडझोनच्या जिल्ह्यांतील रुग्णांचा समावेश आहे. या वाढत्या संख्येमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मोठ्या प्रमाणात ई-पास परवानेधारक आल्यास जिल्ह्यात त्यांचे अलगीकरण व विलगीकरण करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
त्यामुळे संस्थात्मक विलगीकरणासाठी सुविधा उपलब्ध होण्यास अडचणी होऊन इतर धोके वाढण्याची शक्यता आहे तरी आपल्याकडील ह्यई-पासह्णच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांना कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाप्रमाणे परवाने द्यावेत. रेडझोनसह राज्यांतील प्रतिबंधित क्षेत्रांतून इतर जिल्ह्यांत जाण्यासाठी असलेल्या केंद्र सरकारच्या मानक प्रणालीनुसार हे परवाने द्यावेत, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.रेडझोनमधून कोल्हापुरात येणाऱ्यांसाठी वेळापत्रक (रविवार ते ३१ मे)
(पोलीस आयुक्तालय) मंगळवार बुधवार गुुरुवार शुक्रवार शनिवार रविवार
- मुंबई ६५ १०० १०० १०० १०० १००
- नवी मुंबई ५० ५० ५० ५० ५० ५०
- पुणे ५० ५० ५० ५० ५० ५०
- पिंपरी-चिंचवड ५० ४५ ५० ५० ५० ५०
- सोलापूर २५ २५ २५ २५ २५ २५
- ठाणे २०० ३५० ४०० ४०० ४०० ४००
जिल्हाधिकारी कार्यालय
मंगळवार बुधवार गुुरुवार शुक्रवार शनिवार रविवार
- पालघर (ग्रामीण) १०० १५० २०० २०० २०० २००
- पुणे ५० ५० ५० ५० ५० ५०
- रायगड ६० ९० १०० १०० १०० १००
- ठाणे ५० ७५ १०० १०० १०० १००
- इतर जिल्हे १४० २२५ २७५ २७५ २७५ २७५
- इतर राज्ये १०० २०० २०० २०० २०० २००