शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

CoronaVirus : कॉंग्रेसतर्फे ५०० स्वयंचलित सॅनिटायझर यंत्रे बसवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 6:17 PM

येथून पुढच्या काळात कोरोनाला सोबत घेऊनच जगायचे असल्यामुळे जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेस समितीच्यावतीने ५०० स्वयंचलित सॅनिटायझर यंत्रे बसविण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे बोलताना दिली. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देकॉंग्रेसतर्फे ५०० स्वयंचलित सॅनिटायझर यंत्रे बसवणारपालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती

कोल्हापूर : येथून पुढच्या काळात कोरोनाला सोबत घेऊनच जगायचे असल्यामुळे जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेस समितीच्यावतीने ५०० स्वयंचलित सॅनिटायझर यंत्रे बसविण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे बोलताना दिली. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्हा कॉंग्रेस पक्षातर्फे बसविल्या जाणाऱ्या ५०० पैकी पहिल्या १०० स्वयंचिलत सॅनिटायझर यंत्रांचे वाटप पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. कोल्हापूर शहरात २५०, इचलकरंजी शहरात ६०, तर प्रत्येक तालुक्यात अशी सॅनिटायझर यंत्रे बसविण्यात येणार आहेत. याशिवाय सर्व पोलीस ठाणी, शासकीय कार्यालये, पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालय, एस टी स्टँड, आदी ठिकाणीसुध्दा ही यंत्रे बसविली जाणार आहेत. प्रत्येकी पाच लिटर क्षमतेची ही सॅनिटायझर यंत्रे असून त्याची देखभाल कॉंग्रेस कार्यकर्ते करणार आहेत.लॉकडाऊन काळात कॉंग्रेस पक्षातर्फे केलेल्या मदतीची माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली. परप्रांतियांची रेल्वेने जाण्याची सोय झाल्यानंतर त्यांची जेवणाची, चहा, नाश्ता, दूध याची सोय केली. त्याचा सुमारे ३६ हजार परप्रांतियांना लाभ झाला. कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर उत्तर या दोन मतदारसंघांत प्रत्येकी पंधरा हजार कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा केला. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या औषधांचे वितरण केले, असे पाटील यांनी सांगितले.यावेळी इचलकरंजी नगरपालिकेचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. प्रारंभी माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक केले.

याप्रसंगी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजीव आवळे, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक, संध्या घोटणे, तालुकाध्यक्ष शामराव देसाई, हिंदुराव चौगुले, सर्जेराव शिंदे, जयसिंग हिर्डेकर, शंकरराव पाटील, भगवान जाधव, सत्यजित जाधव, विजयसिंह मोरे, संजय कांबळे, बसवराज आजरी, सागर चव्हाण, सुप्रिया साळोखे, तौफिक मुल्लाणी उपस्थित होते.दोन पालकमंत्रीमधील फरक कळालामागच्या सरकारमधील आणि आताचे पालकमंत्री यांच्या कामातील फरक जनतेच्या लक्षात आला. मागचे पालकमंत्री नुसतेच बोलायचे, पण आताचे पालकमंत्री बोलत नाहीत तर करून दाखवतात, असे शशांक बावचकर यांनी सांगितले. जिल्ह्यात नवीन रोजगार, बंद पडलेले उद्योग सुरू करून बंद पडलेले अर्थचक्र पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न सतेज पाटील करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील