शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

CoronaVirus : कोरोनाग्रस्तांची संख्या मंदावली; रुग्णसंख्या ६३०वर; एकूण २८२ जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 5:10 PM

गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूच्या आजारावर मात करून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले. त्यामुळे डिस्चार्ज झालेल्यांची संख्या २८२ झाली, ही दिलासादायक बाब आहे; तर रोजच्यापेक्षा कोरोनाग्रस्तांची संख्या पूर्णपणे मंदावली. सकाळपर्र्यत एकाही नव्या रुग्णांची भर पडली आहे; त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ६३० पर्यंत पोहोचली आहे.

ठळक मुद्देकोरोनाग्रस्तांची संख्या मंदावलीरुग्णसंख्या ६३०वर; एकूण २८२ जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर : गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूच्या आजारावर मात करून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले. त्यामुळे डिस्चार्ज झालेल्यांची संख्या २८२ झाली, ही दिलासादायक बाब आहे; तर रोजच्यापेक्षा कोरोनाग्रस्तांची संख्या पूर्णपणे मंदावली. सकाळपर्र्यत एकाही नव्या रुग्णांची भर पडली आहे; त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ६३० पर्यंत पोहोचली आहे.गेल्या महिनाभरात मुंबईसह रेड झोनमधील नागरिक कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने आल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे; पण मंगळवार, बुधवारी ही संख्या मंदावल्याचे चित्र दिसून आले, ही समाधानाची गोष्ट आहे.सकाळपर्यंत आरोग्य प्रशासनास ७४ चाचणी अहवाल प्राप्त झाले, त्यामध्ये ७३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. ६३0 पैकी यापूर्वीच्या एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहहे. आतापर्र्यत ३४२ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली आहे.जिल्ह्यात ६३0 पैकी तब्बल २८२ जणांनी कोरोनाशी लढा देत आजारावर मात केल्याने त्यांना कोरोनामुक्त करण्यात आले, त्या सर्वांना डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्याची संख्या २६९ झाली ही दिलासादायक बाब आहे. सद्य:स्थितीत सीपीआरच्या विशेष कोरोना कक्षात ३४२ बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांपैकी १२ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे; तर यापूर्वी सहाजणांचा मृत्यू झाला आहे.प्रलंबित चाचणी अहवाल संपलेगेल्या १५ दिवसांत क्वारंटाईन केलेल्यांपैकी तपासणीसाठी घेतलेल्या स्रावाचे चाचणी अहवाल प्रलंबित राहण्याची संख्या मोठी होती. त्यामुळे क्वारंटाईन केलेल्या रुग्णाला चाचणी अहवालाची आठवडाभर प्रतीक्षा करावी लागत होती; पण शेंडा पार्कमधील प्रयोगशाळेत सिंगापूरहून आलेले नवीन मशीन बसविण्यात आले; त्यामुळे चाचणी अहवाल झपाट्याने निकाली निघाले. त्यामुळे चाचणी अहवालाची प्रतीक्षा संपली आहे. आता रोजचे किमान २०० चाचणी अहवाल दुसऱ्यााच दिवशी निकाली निघण्याची शक्यता आहे.तालुकानिहाय कोरोनाग्रस्तांची एकूण संख्याआजरा- ५०, भुदरगड- ६५, चंदगड- ७१, गडहिंग्लज- ६७, गगनबावडा- ६, हातकणंगले- ६, कागल- ५३, करवीर- १२, पन्हाळा- २४, राधानगरी- ६३, शाहूवाडी- १६७, शिरोळ- ७, नगरपालिका (इचलकरंजी ७, जयसिंगपूर ३, कुरुंदवाड १)- ११, कोल्हापूर महानगरपालिका- २१, इतर जिल्हे व राज्य (पुणे १, कर्नाटक २,आंध्र प्रदेश १, सोलापूर १)- ७.पॉझिटिव्ह चाचणी प्रमाण घटण्याची शक्यतागेल्या १५ दिवसांत मुंबई, पुणे व इतर जिल्ह्यांतून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केलेले आहेत, त्यांपैकी लक्षणे न दिसणा?्यांना संस्था विलगीकरण अगर गृह विलगीकरणात ठेवलेले आहे. अशांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्यांची स्रावचाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे रोज काही चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे; पण त्याचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर