बेळगाव : बेळगावात सोमवारी दुपारी एका दहा वर्षाच्या मुलाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकूण कोरोना रुग्णांची संख्या १२२ इतकी झाली आहे. झाल्या आहेत. दुसरीकडे कर्नाटक राज्यात ६९ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून राज्याचा आकडा २१५८ वर पोहोचला आहे.बेळगाव तालुक्यातील हंदीगनूर गावातील दहा वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. हा मुलगा मुंबईहून आल्याची ट्रॅव्हल हिस्टरी आहे.हंदीगनूर येथे एकूण चाळीस जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या घशाचे स्त्राव तपासणीसाठी आरोग्य खात्याने घेतले आहेत.आरोग्य खात्याच्या रिपोर्टमध्ये दहा वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.या मुलाला आता अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.क्वारंटाईन केलेल्या पैकी अजून तीस व्यक्तीचे तपासणीचे रिपोर्ट अद्याप प्रतीक्षेत आहेत अशी माहिती उपलब्ध झाली आहे.एकूणच बेळगावात महाराष्ट्र कनेक्शनचे पॉझिटिव्ह वाढत आहेत.
Coronavirus in karnataka : बेळगाव तालुक्यातील हंदीगनूरात दहा वर्षीय बालक कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 5:54 PM
बेळगावात सोमवारी दुपारी एका दहा वर्षाच्या मुलाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकूण कोरोना रुग्णांची संख्या १२२ इतकी झाली आहे. झाल्या आहेत. दुसरीकडे कर्नाटक राज्यात ६९ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून राज्याचा आकडा २१५८ वर पोहोचला आहे.
ठळक मुद्देबेळगाव तालुक्यातील हंदीगनूरात दहा वर्षीय बालक कोरोना पॉझिटिव्हकर्नाटक राज्याचा आकडा २१५८ वर