कोल्हापूर : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी ४१ कोव्हिड केअर सेंटर स्थापन केले असून यामध्ये रूग्णसेवेसाठी पहिल्या टप्प्यात ३ हजार १४२ बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. उर्वरित दोन टप्प्यात ४ हजार १११ बेड तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी येथे दिली.डॉ. साळे म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग दक्ष आणि सजग आहे. जिह्यात ४ कोव्हिड केअर सेंटरमधून ओपीडी सुरू झाल्या आहेत. डेडीकेटेड कोव्हिड हॉस्पिटलच्या माध्यमातून तीन टप्प्यात २ हजार ६८४ बेड निर्माण तयार करण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत १०८० बेड तयार करण्यात आले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत ह्यआयुषह्ण प्रणालीव्दारे जिल्ह्यातील ५० किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या लोकांना प्रतिबंधात्मक व रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी संशमनी वटी या आयुर्वेदिक आणि अ१२ील्ल्र४े अ’ु४े 30 ही होमिओपॅथी औषधे पुरविण्यात येत आहेत.आतापर्यंत ६१ हजार ८८२ जणांची तपासणीकोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 22 चेकपोस्ट तयार करण्यात आले असून आतापर्यंत ६१ हजार ८८२ तपासणी करण्यात आल्या. जिल्ह्यात येणाऱ्यांची थर्मल स्क्रिनींगव्दारे तपासणी करण्यात येत असून १७६१ प्रवाशांना घरी अलगीकरण व १०८३ प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.तालुकास्तरावर १५ ठिकाणी स्वॅब नमुने घेण्याची सोयकोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळा बळकटीकरणावर भर दिला असून संशयीत रूग्णांचीतात्काळ तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अत्याधुनिक मशिन उपलब्ध झाल्यामुळे तात्काळ निदान होत आहे. यापूर्वी सीपीआर येथे स्वॅब नमुने सुविधा होती. आता तालुकास्तरावर 15 ठिकाणी स्वॅब नमुने घेण्याची सुविधा उपलब्ध झाली असल्याचेही डॉ. साळे यांनी सांगितले.
CoronaVirus Lockdown : कोरोना प्रतिबंधासाठी ७२५३ बेडची तयारी, ४१ कोव्हिड सेंटर स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 5:08 PM
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी ४१ कोव्हिड केअर सेंटर स्थापन केले असून यामध्ये रूग्णसेवेसाठी पहिल्या टप्प्यात ३ हजार १४२ बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. उर्वरित दोन टप्प्यात ४ हजार १११ बेड तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी येथे दिली.
ठळक मुद्देकोरोना प्रतिबंधासाठी ७२५३ बेडची तयारीआतापर्यंत ३१४२ बेड सज्ज : ४१ कोव्हिड सेंटर स्थापन