कोल्हापूर : येथील वंदे मातरम् यूथ ऑर्गनायझेशन, द नेशन फर्स्ट व समस्त हिंदुत्ववादी संघटनेमार्फत परिचारिका दिनानिमित्त मंगळवारी महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील सर्व परिचारिकांचे गुलाबपुष्प देऊन त्या देत असलेल्या सेवेबद्दल कौतुक करण्यात आले.या वेळी रुग्णालयातील सर्व परिचारिका, सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे मुख्य डॉ. प्रकाश पावरा, वंदे मातरम् व द नेशन फर्स्टचे अध्यक्ष अवधूत भाट्ये, समस्त हिंदुत्ववादी संघटनेचे बंडा साळुंखे, पतितपावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, दिनकरराव साळोखे चॅरिटेबल फौंडेशनचे अध्यक्ष अतुल साळोखे, प्रकाश सरनाईक, ब्राह्मण जागृती संघाचे जिल्हाध्यक्ष स्वानंद कुलकर्णी, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप, सुवर्णा पवार, क्षत्रिय मराठा रियासतचे प्रसाद मोहिते, शंभुसेना फौंडेशनचे सचिन भोसले, साळोखे फौंडेशनचे आशिष साळोखे, अतीश साळोखे उपस्थित होते.फोटो क्रमांक - १२०५२०२०-कोल-केएमसी- सावित्रीबाई फुलेओळ - कोल्हापूर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात मंगळवारी परिचारिका दिनानिमित्त सर्व परिचारिकांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्या सेवेचा गौरव करण्यात आला.
CoronaVirus Lockdown : सावित्रीबाईमध्ये परिचारिका दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 7:06 PM
कोल्हापूर येथील वंदे मातरम् यूथ ऑर्गनायझेशन, द नेशन फर्स्ट व समस्त हिंदुत्ववादी संघटनेमार्फत परिचारिका दिनानिमित्त मंगळवारी महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील सर्व परिचारिकांचे गुलाबपुष्प देऊन त्या देत असलेल्या सेवेबद्दल कौतुक करण्यात आले.
ठळक मुद्देसावित्रीबाईमध्ये परिचारिका दिन साजरा सर्व परिचारिकांचे गुलाबपुष्प देऊन कौतुक