कोल्हापूर : लॉकडाऊनमधून इतर व्यवसायांसाठी थोडी शिथिलता असली तरी सलून व्यवसाय ३१ मेपर्यंत पूर्णपणे बंदच राहणार असल्याचे चित्र आहे. परवानगीसंदर्भात विविध नाभिक समाज संघटनांकडून मागणी होत असली तरी जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.संपूर्ण देशात लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. या चौथ्या टप्प्यात तरी इतर व्यवसायांप्रमाणे काही बंधने घालून सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी यासाठी नाभिक समाज संघटनांकडून प्रयत्न सुरू आहेत, परंतु सर्वाधिक प्रसाराचे साधन म्हणजे हा व्यवसाय आहे. लोकांशी थेट जवळून संपर्क येत असल्याने दोघांनाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सलूनची दुकाने सुरू करण्याची जोखीम घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे लॉकडाऊनचा चौथा टप्पा पूर्ण होईपर्यंत तरी या व्यवसायाला परवानगी मिळण्याची शक्यता दिसत नाही.
CoronaVirus Lockdown : सलून व्यवसाय ३१ मे पर्यंत लॉकडाऊनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 7:40 PM
लॉकडाऊनमधून इतर व्यवसायांसाठी थोडी शिथिलता असली तरी सलून व्यवसाय ३१ मेपर्यंत पूर्णपणे बंदच राहणार असल्याचे चित्र आहे. परवानगीसंदर्भात विविध नाभिक समाज संघटनांकडून मागणी होत असली तरी जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
ठळक मुद्देसलून व्यवसाय ३१ मे पर्यंत लॉकडाऊनच अद्याप कोणताही निर्णय नाही