कोल्हापूर : तिथीनुसार साजरी होणारी शिवजयंती कोरोनामुळे प्रथमच कोणत्याही पारंपरिक वाद्य, पोवाडे, व्याख्याने आणि मिरवणुकांशिवाय सामाजिक बांधीलकी जपत शनिवारी शहरात साजरी करण्यात आली. दरवर्षी चौकाचौकांत मंडप उभारून साजरी होणारी शिवजयंती यंदा मात्र घराघरांत मोठ्या उत्साहात साजरी झाली.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा संदेश देत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली. सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी घरोघरी शिवजन्मकाळ सोहळा साजरा झाला. दरवर्षी सार्वजनिक मंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित व्याख्याने, विविध स्पर्धा, मिरवणुका यंदा कोरोनामुळे रद्द केले.शिवाजी चौकशिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती शिवाजी चौकामध्ये साजरी करण्यात आली. महापौर निलोफर आजरेकर, शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या हस्ते मूर्ती अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर शिवजन्मकाळ सोहळा साजरा झाला.
शिवजयंतीनिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, आर. के. पोवार, उदय शिंदे, स्थानिक नगरसेवक ईश्वर परमार, आर. के. पोवार, शहाजी तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यासह दिवसभर या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी काही कार्यकर्ते येत होते.संयुक्त जुना बुधवार पेठतोरस्कर चौक येथील संयुक्त जुना बुधवार सेवाभावी संस्थेतर्फे शिवजयंती अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. संस्थेचे कार्यकारी मंडळातर्फे अनेक गरजूंना धान्याचे वाटप करून संर्स्थेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला धनादेश देण्यात आला तसेच सर्व कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या की आपल्या पेठेतील कोणताही गरीब उपाशीपोटी झोपता कामा नये त्याची योग्य ती खबरदारी सर्वांनी घ्यावी.
प्रशासनाच्या सूचनेचे पालन करून सोशल डिस्टन्सिंग ठेवावे अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घरातून बाहेर पडावे, घरीच रहा सुरक्षित रहा असा मेसेज सर्व कार्यकर्त्यांनी बुधवार पेठेतील नागरिकांना शिवजयंती निमित्त देण्यात आला.
या कार्यक्रमाला संयुक्त जुना बुधवार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष धनंजय सावंत, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, अमोल डांगे, नागेश घोरपडे, भाजप माजी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, सुशील भांदिगरे, उदय भोसले, अनिल निकम, नामदेव आवटे, संदीप राणे, हेमंत साळोखे, रमेश गवळी, महावीर पोवार, रणजित शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते.मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळमिरजकर तिकटी येथील शेषनारायण मंदिरात वस्ताद बाबूराव चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन केले. मोजक्या कार्यकर्त्यांसह सोशल डिस्टन्स पाळत कार्यकर्त्यांनी शिव जन्मकाळ सोहळा पार पडला. दरवर्षी मंडळाच्यावतीने विविध स्पर्धा, व्याख्याने शाहिरी, पोवाडे, मिरवणुकीद्वारे शिवजयंती साजरी केली जाते. यंदा ते सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. यावेळी बाबा पार्टे, अशोक पोवार, रमेश मोरे, वसंत मुळीक, जयकुमार शिंदे, संदीप चौगुले, सुभाष पोवार, पम्पू सुर्वे, श्रीकांत माने, उदय पाटील, केशव चेंडके, संजय साळोखे, राजेश बाणदार आदी उपस्थित होते.श्री उत्तरेश्वर पेठश्री उत्तरेश्वर पेठ संयुक्त शिवजयंती सोहळ्यांतर्गत शिवचरित्राचे डिजिटल पारायण करण्यात आले. यासह तालमीमध्ये मोजके पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची व्हिडिओ लिंक पाठविण्यात आली तसेच ‘संयुक्त उत्तरेश्वर’च्या वतीने ‘घर तेथे शिवजयंती’अंतर्गत आपल्या घरात साजरा करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवाचे फोटो तसेच महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांचे फोटो व्हॉट्स अॅपवर पाठविण्यासाठी आवाहन केले.
यामधील उत्कृष्ट सजावट व रांगोळीसह बक्षिसे दिली जाणार आहेत. यासह घरावरती झेंडे भगवे झेंडे उभे करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सुरेश कदम, किशोर घाटगे, शिवतेज सावंत, पंकज पाटील, विराज चिखलीकर, रोहित भोसले, अमित बाबर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.कैलासगडची स्वारी मंदिरात शिवजयंती साधेपणाने साजरीखासबाग, मंगळवार पेठेतील ऐतिहासिक कैलासगडची स्वारी मंदिरात यंदाची शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या तैलचित्राचे पूजन मंदिराचे विश्वस्त सुनीलकुमार सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी बबेराव जाधव होते. यावेळी पाळणा, सुंठवडा व प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक संभाजी जाधव, केशव पोवार, विठ्ठल व शिवाजी जाधव, गणेश, प्रसाद व किशोर भोसले, शरद व अनिल गौड, राजेंद्र व प्रसाद भोसले, बाळासाहेब व दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते. विलास गौड यांनी आभार मानले.सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठानशिवजयंतीनिमित्त ‘वैचारिक शिवजयंती’ या सजावट व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सजावट स्पर्धा पारंपरिक व वैचारिक अशा दोन गटांत तसेच वक्तृत्व स्पर्धा पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी या दोन गटांत होणार आहे. शनिवारी दिवसभरात सुमारे पन्नास व्हिडिओ यावेळी आले होते. ही स्पर्धकांनी आपले व्हिडिओ २६ तारखेपर्यंत ९५६१२८९६३३ या क्रमांकावर व्हॉट्स अॅपवर पाठवावेत, असे आवाहन अध्यक्ष अभिजित सूर्यवंशी यांनी केले आहे.