कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे कोल्हापूरात आडकून पडलेले परप्रातीय मजूर सोमवारी सायंकाळी जबलपूर (मध्यप्रदेश) कडे ‘ श्रमिक एक्सप्रेस’ने रवाना झाले. ज्यांनी जिल्हा प्रशासनाने गावी जाण्यासाठी अर्ज केले होते व त्यांची आरोग्य तपासणी करून प्रशासनाने मान्यता दिली त्या १२०० मजूरांना पाठविण्यात आले. शिरोली, गोकुळ शिरगाव या औद्योगिक वसाहतीमधील मजूरांची संख्या अधिक होती. यावेळी त्यांची योग्य ती तपासणी करून त्यांना सोडण्यात आले.
कोल्हापूरमधून ही पहिलाची रेल्वे सोमवारी रवाना होत आहे. राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर कोल्हापूर ते जबलपूर अशी थेट रेल्वेचे येथून नियोजन करण्यात आले. प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून, पोलीस, प्रशासन व रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योग्य ते नियोजन केले. यावेळी त्यांना जेवणाची, पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. गर्दी होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तसेच रेल्वे परिसरातील काही रस्ते बंद करण्यात आले होते.