कोल्हापूर – संपूर्ण देशात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामकाज ठप्प झाल्याने हजारो मजूर शहरातून गावाकडे परतत आहेत. काही जण पायपीट करतंय काही रेल्वे, बस ज्या सुविधा उपलब्ध होतील त्यातून परराज्यात त्यांच्या मूळ गावी जाण्याचा प्रयत्न करत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येने परराज्यातील मजूर यूपी, बिहार या राज्यात पोहचत आहेत. कोल्हापूरसारख्या ग्रामीण भागातून परराज्यात जाणाऱ्या मजुरांची संख्याही मोठी आहे. अशातच कोल्हापूरहून उत्तर प्रदेशला जाण्यासाठी निघालेल्या एका तरुणाच्या हातात असलेल्या फोटोनं सर्वांचे लक्ष वेधलं. छत्रपतींचे विचार युवकांना सांगण्यासाठी मूळचा बनारसचा असणाऱ्या तरुणाने शिवराज्याभिषेकाचा फोटो घेऊन ट्रेनमधून रवाना झाला. ‘हम भी शिवाजी महाराज इनपर बहुत प्यार करते है’ अशी भावना या तरुणाने व्यक्त करत छत्रपतींचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.
सुशील यादव असं या तरुणाचं नाव आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील असणारा हा तरुण गेल्या १३ वर्षापासून कागलमध्ये राहतो. येथील मयूर एस टी कॅन्टीनमध्ये तो काम करतो. या परिसरात त्याचे अनेक मित्र आहेत. कोल्हापूर हे छत्रपतींच्या गादीचा वारसा असणारं ठिकाण आहे. त्यामुळे अनेक तरुणांप्रमाणे सुशील यादवलाही छत्रपती शिवरायांबद्दल आदर आणि प्रेम आहे. अनेक वर्षापासून तो शिवजयंती, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमासाठीही आर्वजून हजेरी लावतो.
देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. गेल्या २ महिन्यापासून कामकाज बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सुशील यादव यालाही कागल सोडून पुन्हा बनारसला परतावं लागत आहे. पण जाताना छत्रपतींची आठवण म्हणून त्याने शिवराज्याभिषेक सोहळ्याचं पोस्टर घेऊन उत्तर प्रदेशला जात होता. त्यावेळी अनेकांनी त्याचं कौतुक केले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
डोनाल्ड ट्रम्प यांची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली; कोरोनावर लस मिळण्याची आशा वाढली!
आनंदाची बातमी; ‘या’ नैसर्गिक वनस्पतीतून भारत बनवणार कोरोनावर ‘रामबाण’ औषध?
कोरोना नसतानाही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प का करतायेत ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’चं सेवन?
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी गुजरातच्या कंपनीने बनवलेलं 'धमण १' व्हेंटिलेटर अयशस्वी
४५ वर्षापूर्वी बेपत्ता झालेली व्यक्ती अचानक गावात आली; कुटुंबाने काय केलं पाहा!