कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपर्यंत फक्त दोन रुग्णांचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या महिनाभरात सातत्याने रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढत होते. इतक्या कमी संख्येने चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६२५ पर्यंत पोहोचली आहे.मुंबई, पुण्यासह रेड झोनमधून कोल्हापुरात गावी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने गेल्या महिनाभरात कोरोनाबाधितांची संख्याही तितकीच झपाट्याने वाढत गेली. त्यामुळे सोमवारी (दि. १) ही संख्या ६२३ पर्यंत पोहोचली होती; पण मंगळवारी सायंकाळी चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.
हे दोन्हीही रुग्ण कागल तालुक्यातील आहेत. त्यामुळे कागल तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या ५३ वर पोहोचली आहे. इतक्या कमी संख्येने पॉझिटिव्ह अहवाल येण्याची गेल्या महिन्यातील ही पहिलीच वेळ आहे. कोरोनाबाधितांची संख्या ६२५ वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वांत जास्त रुग्ण हे शाहूवाडी तालुक्यातील १६४ इतके आहेत.दरम्यान, दिवसभरात एकाही रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आलेला नाही. त्यामुळे कोरोना आजारावर मात करून पूर्णपणे बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्यांची संख्या ही १९५ आहे.