शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

CoronaVirus : कोविडसाठी सलग सात दिवस सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरांना मानधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 4:01 PM

कोविडच्या उच्चाटनासाठी खासगी डॉक्टरांनी सामाजिक बांधीलकी म्हणून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. सलग सात दिवस कर्तव्यावर असणाऱ्या खासगी पदवीधर डॉक्टरांना प्रतिदिन दोन हजार रुपये, तर उच्च पदवीधरांना तीन हजार रुपये मानधन देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

ठळक मुद्देकोविडसाठी सलग सात दिवस सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरांना मानधन सामाजिक बांधीलकी म्हणून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा : दौलत देसाई

 कोल्हापूर : कोविडच्या उच्चाटनासाठी खासगी डॉक्टरांनी सामाजिक बांधीलकी म्हणून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. सलग सात दिवस कर्तव्यावर असणाऱ्या खासगी पदवीधर डॉक्टरांना प्रतिदिन दोन हजार रुपये, तर उच्च पदवीधरांना तीन हजार रुपये मानधन देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांनी खासगी डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोनाच्या निर्मूलनासाठी सामाजिक बांधीलकी म्हणून खासगी डॉक्टरांनी ऐच्छिक सेवा बजावावी. जिल्हा प्रशासनाकडून त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल.

सलग सात दिवस कर्तव्यानंतर पुढील सात दिवस अलगीकरण अशा स्वरूपाचे नियोजन अपेक्षित आहे. अपवादात्मक प्रकरणात तीन ते चार दिवसांची सेवा स्वीकारली जाईल. विनामानधन सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे स्वागतच असेल. तालुका आरोग्याधिकारी,‍ जिल्हा आरोग्याधिकारी, उपजिल्हाधिकारी यांनी बजावलेल्या आदेशांचे जे डॉक्टर पालन करीत आहेत, त्यांना विमा कवच असेल. कर्तव्य बजावत असताना दुर्दैवाने अपघात घडल्यास त्यालाही विमा असेल.

डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची राहण्याची, जेवणाची व अलगीकरणासाठी व्यवस्था केली जाईल. त्याचबरोबर त्यांना सुरक्षा किटही दिले जाईल. कोविडसाठी कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांना जिल्हा प्रशासनामार्फत विशेष प्रमाणपत्रही दिले जाईल, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, स्वीय साहाय्यक विज्ञान मुंडे उपस्थित होते.शासकीय खर्चातून उपचारकोणत्याही डॉक्टरला दुर्दैवाने लागण झाल्यास शासकीय खर्चातून त्यांच्यावर उपचार केले जातील. खासगी पॅरामेडिकल स्टाफ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रुग्णवाहिका यांनी कोविडविरुद्धच्या युद्धात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी देसाई यांनी केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूरdocterडॉक्टर