कोल्हापूर : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३०५ स्वयं-सहाय्यता समूहांनी लॉकडाऊनच्या काळात पाच लाख ५५ हजार ७४२ मास्कची निर्मिती करून ७१ लाख ३५ हजार १६ रुपये किमतीच्या मास्कची विक्री केली. या विक्रीमुळे जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला.जनता कफ्यूर्नंतरच्या दुसऱ्या दिवसापासून सरकारकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यात मास्कची बाजारातील मागणी लक्षात घेऊन जिल्ह्यातील ३०५ स्वयंसहाय्यता समूहांतील १३०१ महिला सदस्यांनी आजअखेर पाच लाख ५५ हजार ७४२ मास्कची निर्मिती केली. त्यातून ७१ लाख ३५ हजार १६ रुपयांची कमाई केली.
निर्मिती केलेले सर्व मास्क जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने खरेदी केले. कोरोनासारख्या महामारीत महिलांनी लावलेला हातभार मोलाचा ठरतो आहे.यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांचे मार्गदर्शन लाभले.कागलमध्ये सर्वाधिक मास्कची निर्मितीएकूण मास्कच्या निर्मितीमध्ये कागलमधील १७ स्वयंसहाय्यता समूहांनी सर्वाधिक दोन लाख ४२ हजार १० मास्कची निर्मिती करीत जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकाविला.स्वयंसहाय्यता समूह आजरा- १२, भुदरगड- १५०, चंदगड- १५, गडहिंग्लज- १७, गगनबावडा- ११, हातकणंगले- १२, कागल- १७, करवीर- १६, पन्हाळा- १४, राधानगरी- १६, शाहूवाडी- १३, शिरोळ- १२ एकूण ३०५ स्वयं-समूहांचा समावेश आहे.