कोल्हापूरः जिल्ह्यामध्ये शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ५५६ इतकी झाली आहे. दिवसभरामध्ये ५२ रूग्ण वाढले आहेत. जिल्ह्यात मध्यंतरीच्या काळात चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे ही संख्या वाढल्याचे सांगण्यात येते.जिल्ह्यामध्ये मुंबई, पुणे, नवी मुंबई, रायगड, सोलापूर आणि सांगली या बाधित जिल्ह्यातून ३ मे २०२० नंतर सुमारे ३० हजार नागरिक आले आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ही माहिती दिली आहे. यातील साडे अठरा हजार नागरिकांची आरोग्य यंत्रणेने तपासणी केली आहे. यामध्ये ५५६ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्व पॉझिटिव्ह व्यक्ती या संस्थात्मक किंवा गृह अलगीकरणामध्ये वास्तव्यास आहेत.मध्यंतरी दहा दिवसांमध्ये बाधित जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांवर प्रतिबंध घालण्यात आला होता. मात्र आता कोल्हापुरातील प्रयोगशाळांवरील ताण कमी झाल्यामुळे पुन्हा नागरिकांना सोडले जात आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
CoronaVirus : राज्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील रूग्णसंख्या साडे पाचशेहेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 6:59 PM
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ५५६ इतकी झाली आहे. दिवसभरामध्ये ५२ रूग्ण वाढले आहेत. जिल्ह्यात मध्यंतरीच्या काळात चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे ही संख्या वाढल्याचे सांगण्यात येते.
ठळक मुद्देराज्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील रूग्णसंख्या साडे पाचशेहेवरकोरोनबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता