कोल्हापूर : जिल्ह्यात आज सकाळी १० वाजता ३१३ प्राप्त अहवालापैकी ९ अहवाल पॉझीटिव्ह तर २८५ अहवाल निगेटिव्हआले आहेत. यामध्ये सिंधुदुर्गच्या १९ अहवालांचा समावेश आहे.
आजअखेर जिल्ह्यात एकूण ३४१ पॉझीटिव्ह रुग्ण असून आतापर्यंतचा आकडा ४३६ इतका झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.आज सकाळी १० वाजेपर्यत प्राप्त ९ पॉझीटिव्ह अहवालामध्ये, चंदगड १, राधानगरी ३, शाहूवाडी ४, सोलापूर १ असा समावेश आहे. आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- ३२, भुदरगड- ५१, चंदगड- २७, गडहिंग्लज- ३०, गगनबावडा- ६, हातकणंगले- ५, कागल- १५, करवीर- १२, पन्हाळा- २३, राधानगरी-५२, शाहूवाडी- १४०, शिरोळ- ५, नगरपरिषद क्षेत्र- ११, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-२० असे एकूण ४२९ आणि पुणे -१, सोलापूर-३, कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-१ इतर जिल्हा व राज्यातील पाच असे मिळून एकूण ४३६ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.जिल्ह्यातील ४३६ रूग्णांपैकी ९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण ४ जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ३४१ इतकी आहे.