कोल्हापूर : भाजी विक्रीसाठी मंडईतच बसण्याचा आग्रह विक्रेत्यांनी धरल्यामुळे शुक्रवारी सकाळी कपिलतर्थ भाजी मंडईत महापालिका कर्मचारी आणि विक्रेते यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सुमारे दोन तासाच्या वादावादीनंतर पालिका कर्मचाऱ्यांनी मंडईचे सर्व मार्ग बॅरिकेड लावून बंद केले.कोल्हापूर शहरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. भाजीसह सर्वच जीवनावश्यक वस्तू या विक्रेते व दुकानदारांनी घरपोच देण्याच्या आहेत.दुकानात तसेच रस्त्यावर, मंडईत बसून विक्री करता येणार नाही असा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. गुरुवारी त्याला चांगली प्रतिसाद मिळाला, परंतू शुक्रवारी मात्र कपिलतिर्थ मंडईतील विक्रेत्यांनी त्यास जोरदार विरोध केला.विक्रेत्यांनी मंडईत बसूनच भाजी विक्री करण्याचा आग्रह धरला. त्यांनी आपली विक्रीही सुरु केली. परंतू त्याची माहिती कळताच महापालिकेची पथके त्याठिकाणी पोहचली. उपायुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता नारायण भोसले, इस्टेट विभाग प्रमुख सचिन जाधव, अतिक्रमण विभाग प्रमुख पंडीत पोवार हेही त्याठिकाणी पोहचले. तुम्हाला मंडईत बसून भाजी विक्री करता येणार नाही असे त्यांनी विक्रेत्यांना सांगितले. परंतू विक्रेते काही ऐकायला तयार नव्हते.आमच्यामुळेच कोरोना होतो का, आम्ही लांब लांब बसून भाजी विक्री करतोय असे विक्रेते सांगत होते. माजी नगरसेवक अजित ठाणेकर, संदीप वीर,राजू जाधव यांनीही विक्रेत्यांची बाजू घेतली. बरीच वादावादी झाली. विक्रेत्यांच्या या भूमिकेमुळे लक्ष्मीपुरीतील भाजी विक्रेते, फळविक्रेतेही रस्त्यावर आले आणि व्यवसाय सुरु केले. विक्रेते ऐकत नाहीत म्हटल्यावर महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्तीने भाजी मंडई बंद केली. तसेच मंडईत जाणारे रस्ते चारी बाजून बॅरिकेड लावून बंद केले. तसेच स्पीकरवरुन मंठई बंद असल्याचे वारंवार सांगण्यात आले. त्यामुळे दिवसभर ही मंडई बंद राहिली.लक्ष्मीपुरीतील भाजी मंडई पोलिसांनी बंद पाडली. फळ विक्रेते, भाजी विक्रेते यांच्यासह काही दुकाने उघडी होती, तीही बंद करण्यास भाग पाडले.
मनपा कर्मचारी, भाजी विक्रेत्यांत वादावादी , मंडईतच बसण्याचा आग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 6:12 PM
CoronaVirus Kolahpur : भाजी विक्रीसाठी मंडईतच बसण्याचा आग्रह विक्रेत्यांनी धरल्यामुळे शुक्रवारी सकाळी कपिलतर्थ भाजी मंडईत महापालिका कर्मचारी आणि विक्रेते यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सुमारे दोन तासाच्या वादावादीनंतर पालिका कर्मचाऱ्यांनी मंडईचे सर्व मार्ग बॅरिकेड लावून बंद केले.
ठळक मुद्देमनपा कर्मचारी, भाजी विक्रेत्यांत वादावादी , मंडईतच बसण्याचा आग्रहसक्तीने बंद पाडली मंडई, बॅरिकेड लावले