शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

नगरसेवकास मारहाण, नगराध्यक्षांना शिवीगाळ

By admin | Published: September 12, 2016 1:05 AM

एकास अटक : निषेधार्थ आज गडहिंग्लज बंद, विविध संघटनांतर्फे मूक मोर्चाचे आयोजन

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील नागरिकांकडून दान मिळालेल्या गणेशमूर्ती पर्यावरणपूरक विसर्जनासाठी नेताना नगरपालिकेचा ट्रॅक्टर व मुख्याधिकाऱ्यांची गाडी अडवून नगरसेवक नितीन देसाई यांना धक्काबुक्की व मारहाण आणि नगराध्यक्ष राजेश बोरगावे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी धनंजय जयसिंग कळेकर (वय ३५, रा. भगतसिंग रोड, गडहिंग्लज) याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याची जामीनावर सुटका केली आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आज, सोमवारी शहरातील सर्व सामाजिक संघटना आणि व्यापारी संघटनांतर्फे गडहिंग्लज बंद व मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गेल्या दहा वर्षांपासून येथील सामाजिक व शैक्षणिक संस्था-संघटनांतर्फे गणेशमूर्ती व निर्माल्यदानाचा उपक्रम राबविण्यात येतो. त्याकरिता नगरपालिकेतर्फे विसर्जन कुंड (काहिली) व निर्माल्य संकलनासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीची व्यवस्था केली जाते. रविवारी येथील हिरण्यकेशी नदीघाटावर नागरिकांकडून दान मिळालेल्या मूर्ती व निर्माल्य दरवर्षीप्रमाणे नगरपालिकेतर्फे संकलित करण्यात आले. त्यानंतर ते पर्यावरणपूरक विसर्जनासाठी गांधीनगर पलीकडील रिंगरोडलगतच्या पडीक विहिरीकडे ट्रॅक्टरने नेण्यात येत होते. दरम्यान, रात्री पावणेदहाच्या सुमारास पंचायत समिती नजीकच्या पारस हॉटेलसमोरून नगरपालिकेचा ट्रॅक्टर आणि गाडी (क्रमांक एमएच ०९ एसी १००२) जात असताना कळेकरने त्या गाड्या अडविल्या. नगरसेवक देसाई यांना धक्काबुक्की करून मारहाण केली व नगराध्यक्ष बोरगावे यांना शिवीगाळ केली. नगरपालिकेच्या ट्रॅक्टरचा चालक चंद्रकांत इंगळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी कळेकरला अटक केली. त्याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता त्याची रविवारी जामिनावर सुटका झाली. पोलिस उपनिरीक्षक एस. ए. नागरगोजे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी) ंंयांनी केले बंदचे आवाहन गडहिंग्लज शहर किराणा भुसार व्यापारी असोसिएशन, लायन्स क्लब, हॉटेल मालक संघटना, पानपट्टी चालक संघटना, मार्केट यार्ड व्यापारी संघ, इंडियन मेडिकल असोसिएशन, गडहिंग्लज अ‍ॅडव्होकेट बार असो., वॉच मेकर असो., सराफ असोसिएशन, हार्डवेअर व्यापारी असो., कापड व्यापारी संघटना, बेकरी व स्वीट मार्ट असो., कन्फेक्शनरी असो., टू व्हिलर मेकॅनिक असो., कोल्ड्रींक्स असो., नारळ व्यापारी संघटना., परमीट व बीअर बार संघटना, आॅईल मिल संघटना, केमिस्ट असो., सॉ मिल संघटना, आॅटोमोबाईल व स्पेअरपार्ट संघटना, बुकस्टॉल व स्टेशनरी विक्रेता संघटना, फुटवेअर असो., कंझ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर असो., नाभिक संघटना, चर्मकार संघटना, कॉन्ट्रक्टर असो., काटेवाला संघ, केटरिंग असो., युनिव्हर्सल फ्रेंडस् सर्कल आदी संघटनांच्या प्रतिनिधींची दुपारी तातडीची बैठक झाली. त्या बैठकीत लोकप्रतिनिधींवरील भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवून गडहिंग्लज बंद व मोर्चाचे आवाहन केले आहे.