शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

नगरसेवकासह पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना कोंडले - : नागरिकांचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 1:02 AM

न्यू शाहूपुरी परिसरातील बेकर गल्ली येथे ड्रेनेजलाईन तुंबून त्यातील मैलायुक्त सांडपाणी रस्त्यावर पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या तक्रारी होऊनदेखील त्याकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांच्यासह

ठळक मुद्देड्रेनेजलाईन दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलन

कोल्हापूर : न्यू शाहूपुरी परिसरातील बेकर गल्ली येथे ड्रेनेजलाईन तुंबून त्यातील मैलायुक्त सांडपाणी रस्त्यावर पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या तक्रारी होऊनदेखील त्याकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांच्यासह महानगरपालिकेचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी व सहायक पर्यावरण अभियंता आर. के. पाटील यांना गुरुवारी नागरिकांनी अक्षरश: कोंडून घालून आपला राग व्यक्त केला.

‘आधी ड्रेनेजलाईनचे काम कधी करणार ते सांगा’ अशी आक्रमक भूमिका संतप्त नागरिकांनी घेतल्यामुळे तासभर कोंडले गेलेले जलअभियंता सुरेश कुलकर्णी व सहायक पर्यावरण अभियंता आर. के. पाटील गर्भगळीत झाले. ‘ठोस आश्वासनाशिवाय तुम्हाला सोडणारच नाही’ असे ठणकावल्यानंतर कुलकर्णी यांनी फोनवर संपर्क करून एका ठेकेदारास बोलावून घेतले आणि शनिवारपासून काम सुरू करण्याची विनंती केली. ठेकेदारानेही काम करण्याची तयारी दर्शविल्यानंतर या दोघांची सुटका झाली.

न्यू शाहूपुरीतील बेकर गल्लीत गेल्या १0 वर्षांपासून ड्रेनेजलाईन तुंबत असून, त्यातील मैलामिश्रीत सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे; त्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करुनही आतापर्यंत अधिकाऱ्यांनी त्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. अखेर वैतागलेल्या नागरिकांनी जलअभियंता कुलकर्णी, सहायक अभियंता पाटील यांना एम. आर. देसाई फिजिओथेरपी सेंटरजवळ बोलावून घेतले. बेकर गल्लीपासून आयुक्त बंगला ते फिजिओथेरपी सेंटरदरम्यान ठिकठिकाणी ड्रेनेजलाईन तुंबल्याचे त्यांना दाखविले. ड्रेनेजलाईनचे काम कधी करणार? अशी विचारणा केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी अमृत योजनेत धरावे लागेल, निधी उपलब्ध झाला पाहिजे, अशी थातुरमातूर उत्तरे देण्यास सुरुवात केली; त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या दोन अधिकाºयांना फिजिओथेरपी सेंटरमध्ये नेऊन बाहेरून कड्या व कुलूप लावून त्यांना कोंडले. त्यावेळी नगरसेवक रत्नेश शिरोळकर देखील आत होते.

रत्नेश शिरोळकर यांनीही नागरिकांची बाजू घेत, आरोग्याचा प्रश्न असल्याने तो कधी सोडविणार सांगा? अशी विचारणा अधिकाºयांकडे केली. सुमारे तासभर दोन अधिकारी कोंडलेले होते.हॉटेलची संख्या वाढलीकावळा नाका चौक ते दाभोळकर कॉर्नर, न्यू शाहूपुरी, बेकर गल्ली या परिसरात सर्वत्र लोकवस्ती वाढली आहे. हॉटेल्सची संख्याही वाढली आहे. या भागात पूर्वी सहा व नऊ इंची ड्रेनेजलाईन टाकण्यात आली होती; परंतु वाढत्या विस्तारामुळे त्यावर ताण पडत आहे; त्यामुळे मोठ्या क्षमतेच्या ड्रेनेजलाईन टाकण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर