शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

नगरसेवकांना स्वार्थच दिसला

By admin | Published: June 25, 2016 12:21 AM

गडहिंग्लजला राष्ट्रवादीची बैठक : कार्यकर्त्यांनी ‘मन’ मोकळं केलं; युतीचा अधिकार नेत्यांनाच

गडहिंग्लज : सामान्य कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मिळविलेली पालिकेची सत्ता टिकविता आली नाही. पक्षासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांची कदरसुद्धा केली नाही. स्वार्थापलीकडे नगरसेवकांना काहीही दिसले नाही. एकमेकांची उणी-दुणी काढण्यातच पाच वर्षे गेली. पक्ष वाढीसाठी काहीही काम झालेले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत कुणाशी युती करायची याचा अधिकार जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनाच राहील, अशा परखड शब्दांत ‘मन’ मोकळ करतानाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नगरसेवकांच्या कामगिरीचा पाढाच बैठकीत वाचला.राष्ट्रीय नेते शरद पवार यांचा कोल्हापूर दौरा आणि गडहिंग्लज पालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात चार दिवसांपूर्वीही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. त्यानंतर पुन्हा ‘व्यापक’ बैठक बोलविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष वसंत यमगेकर होते.कागल विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राहुल पाटील म्हणाले, पालिकेतील साडेतीन वर्षांची आपली ‘कारकीर्द आणि कामगिरी’ विचारात घेतली तर आगामी निवडणूक स्वबळावर लढवितो म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल. विकासकामांपेक्षा आपली भांडणेच लोकांच्या लक्षात राहिली. त्यामुळे वॉर्डा-वॉर्डांतील जनमत घेऊनच नेत्यांना सल्ला द्यावा.नगरसेवक किरण कदम म्हणाले, सगळ्या चुका केवळ नगरसेवकांवर ढकलू नयेत. पक्षांतर्गत कुरबुरी वेळोवेळी नेत्यांच्या कानावर घालूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. स्वबळावरच लढावे, अशी आपली भूमिका असून, नेत्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा.नगरसेवक हारुण सय्यद म्हणाले, बैठकीतील भावना नेत्यांपर्यंत पोहोचवूया. कोणत्याही परिस्थितीत नगराध्यक्ष राष्ट्रवादीचाच झाला पाहिजे. शहराध्यक्ष यमगेकर म्हणाले, पाच वर्षांतील कामगिरीबाबत सर्वांनीच आत्मचिंतन करायला हवे. झालेल्या चुका दुरुस्त करूया, एकत्र राहून पक्ष वाढवूया. यावेळी शारदा आजरी व चंद्रकांत मेवेकरी यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीस उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, गटनेते रामदास कुराडे, नगरसेविका मंजूषा कदम, अरुणा शिंदे, लक्ष्मी घुगरे, सुनील गुरव, युवराज पाटील, इकबाल शायन्नावर, दिलीप उपराटे, प्रकाश कांबळे, महेश सलवादे, महेश शिंदे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी) कार्यकर्त्यांना दु:खपक्ष व नेत्यांशी एकनिष्ठ राहिलेल्या नगरसेविका सुंदराबाई बिलावर अंतर्गत वादामुळेच आपले कुटुंब सोडून दुसऱ्या कुटुंबात गेल्या. त्यामुळे नेते व सर्वसामान्यांनी मिळवून दिलेली सत्ता गेल्याचे दु:ख कार्यकर्त्यांच्या मनात आहे. मात्र, नगरसेवकांना त्याचे काही वाटत नाही, अशी खंतदेखील राहुल पाटील यांनी व्यक्त केली.