शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! नावाची घोषणा नंतर करणार; दिल्लीच्या बैठकीत काय घडलं?
3
मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?
4
PAN 2.0: नवीन पॅन कार्डमुळे फसवणूक करणं खूप अवघड, जाणून घ्या सर्वसामान्यांना कसं मिळणार संरक्षण?
5
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
7
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
8
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
9
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
10
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
11
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
12
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
13
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
14
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
15
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
16
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
17
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
18
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
19
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

नगरसेवक सर्वोच्च न्यायालयात?

By admin | Published: January 11, 2017 12:59 AM

अपात्रतेची भीती : आयुक्तांचा अहवाल राज्य शासनाकडे

कोल्हापूर : महानगरपालिकेतील २० नगरसेवकांनी मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्रे सादर केली नाहीत म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी आपला अहवाल राज्य शासनास पाठविला असून शासनाच्या संभाव्य कारवाईच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी नगरसेवकांनी सुरू केली आहे. याबाबतची सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास व प्रभाग समिती सभापती अफजल पिरजादे मंगळवारी दिल्लीत पोहोचले. भोर नगरपालिकेतील एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देताना ज्या नगरसेवकांनी त्यांच्या जातीची पडताळणी प्रमाणपत्रे निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे सहा महिन्यांत देणार नाहीत त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, असे म्हटले आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या नगरविकास विभागातर्फे कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतील २० नगरसेवकांनी मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्रे दिली नाहीत, अशांवरील कारवाईचा प्रस्ताव शासनाने मागवून घेतला आहे. त्यामुळे या नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. शासनाने एकतर्फी निर्णय घेऊ नये, या प्रकरणी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्याची तयारी कोल्हापूर महानगरपालिकेतील नगरसेवकांनी सुरू केली आहे. माजी स्थायी सभापती आदिल फरास व अफजल पिरजादे मंगळवारी दिल्लीला रवाना झाले. सायंकाळी ते तेथे पोहोचले. आज, बुधवारी या विषयातील तज्ज्ञ वकिलांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती देऊन ‘एसएलआर’ दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. विभागीय जातपडताळणी समितीने जातीच्या दाखल्यांवर निर्णय उशिरा दिला यात नगरसेवकांचा काही दोष नाही शिवाय जात पडताळणी समितीनेही सुनावणी होऊन निकाल द्यायला उशीर झाला असल्याने कारवाई करण्यात येऊ नये, अशी पत्रे आम्हा नगरसेवकांना दिली आहेत. त्यामुळे निकाल देण्यापूर्वी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी आमची मागणी असल्याचे फरास यांनी सांगितले. प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल व्हायला दोन-तीन दिवस लागतील, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)आवश्यक कागदपत्रांसह काहींनी गाठली दिल्लीवीस नगरसेवकांचे धाबे दणाणलेआज ‘एसएलआर’ दाखल करणार