कोल्हापूर : आठ दिवसांच्या उन्हाचा परिणाम भाजीपाल्याच्या दरांवर झाला. रविवार आठवडी बाजारात कोथिंबिरीची पेंढी १० रुपयांवरून २० रुपयांवर गेली होती. कोबी, कारली, गवार, शेपू, पोकळा यांच्या दरांत वाढ झाली आहे.दुसरीकडे, साखर ३० रुपये प्रतिकिलोवरून ३६ रुपये, तर बेदाण्यांच्या दरात तब्बल शंभर रुपयांची वाढ झाली. बेदाणा ३५० रुपयांच्या घरात गेला आहे. आंब्यांना मागणी कमी होती; पण दर स्थिर होते. लिंबू १० रुपयांना १० होते. दरम्यान, रविवारी झालेल्या पावसामुळे ग्राहकांची बाजारात दैना उडाली.शहरातील लक्ष्मीपुरी आठवडी बाजारासह कपिलतीर्थ मार्केट, राजारामपुरीतील नार्वेकर मार्केट, कसबा बावड्यासह अन्यत्र ग्राहकांची गर्दी होती. दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे ग्राहकांची काही काळ तारांबळ उडाली. त्यानंतर पावसाची उघडीप झाल्यावर मात्र ग्राहकांची गर्दी होऊ लागली.मेथीच्या पेंढीचा दर २० रुपये झाल्याने ग्राहकांनी तिच्याकडे पाठ फिरविल्याचे दिसत होते. कोबी १० रुपये, वांगी, ढबू मिरची, वरणा, दोडका, पोकळा २० रुपये, गवार, कारली ३० रुपये; तर शेपू पेंढी १० रुपये पावकिलो असा दर होता.याचबरोबर भेंडी व गाजराच्या दरांत किंचितशी उतरण झाली आहे. भेंडी २० रुपये, तर गाजर २५ रुपये प्रतिकिलो होते. दोडका पाच रुपयांनी उतरला. तो २५ रुपये झाला होता. कोथिंबिरीची पेंढी २० रुपये होती.तसेच पेरू, सफरचंद यांच्या दरांत घसरण झाली आहे. घाऊक बाजारात पेरूचा २५० रुपयांना डाग, तर किरकोळ बाजारात सफरचंद ८० रुपये प्रतिकिलो होते. तोतापुरी, मद्रास हापूस व मद्रास पायरी आंब्यांच्या दरात वाढ झाली आहे. कांदा, बटाटा व लसूण यांचे दर स्थिर होते.असे आहेत दर (प्रतिकिलो)तांदूळ : ४४ ते ६४ रुपयांपर्यंतजाडा तांदूळ : २४ ते ४० रुपयेतूरडाळ : ६४ व ६८ रुपयेसाखर : ३६ रुपयेहरभराडाळ : ५२ व ६० रुपयेसरकी : ९० रुपयेशाबू : ५० ते ५५ रुपयेवरी : ७२ व ८० रुपयेकाजू : ९०० रुपयेशेंगतेल : १२० रुपयेबदाम ७५० ते ८०० रुपये.सुके खोबरे उतरलेगेल्या दोन महिन्यांपासून सुके खोबऱ्याचा प्रतिकिलो दर हा २२० ते २३० रुपयांच्या घरात होता. चटणी व मसाला करण्यासाठी सुके खोबरे वापरले जाते; पण आता मागणी कमी झाल्यामुळे सुक्या खोबºयाचा दर २०० रुपये होता. २० रुपयांची घसरण झाली आहे.
कोथिंबिरीची पेंढी २० रुपयांवर; लिंबूचे दर घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 1:06 AM