शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

Kolhapur- कफ सिरपचे जार वाटले, मात्र कागदावर नोंदवल्या बाटल्या; जिल्हा परिषदेचे युवराज बिल्ले यांची तडकाफडकी बदली

By समीर देशपांडे | Published: February 14, 2024 1:19 PM

समीर देशपांडे  कोल्हापूर : देणगीतून मिळालेले कफ सिरपचे जार वरिष्ठांना न सांगता ५०हून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित करण्यात ...

समीर देशपांडे कोल्हापूर : देणगीतून मिळालेले कफ सिरपचे जार वरिष्ठांना न सांगता ५०हून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित करण्यात आले. मात्र, कागदोपत्री नोंदवताना सिरपच्या बाटल्या, अशी संशयास्पद नोंद करणारे जिल्हा परिषदेचे औषध निर्माण अधिकारी युवराज बिल्ले संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. चौकशीत ते सकृतदर्शनी दोषी ठरल्याने त्यांची तडकाफडकी चंदगड तालुक्यातील अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.या औषध भांडारमध्ये बिल्ले हे गेली १६ वर्षे कार्यरत होते. कोरोनाकाळातील खरेदीमध्ये ते चर्चेत आले. त्यावेळी त्यांनी चांगले काम केल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदनही केले. परंतु, कोरोनाकाळातील खरेदीप्रकरणी त्यांची चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून झाल्यानंतर त्यांच्या कारभाराची चर्चा सुरू झाली. अशातच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र गायकवाड यांच्याकडे काही प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून दूरध्वनी आले. आम्हाला सिरपचे जार देण्यात आले असून, नोंद मात्र सिरपच्या बाटल्या म्हणून करा, अशा वरिष्ठांकडून सूचना असल्याचे सांगितले जाते. हा प्रकार काय आहे, यावर डॉ. गायकवाड यांनी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर आणि जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी रेंदाळकर यांची चौकशी समिती नेमण्यात आली. या दोघांनी पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, अंबप, ता. हातकणंगले आणि उचगाव, ता. करवीर या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या. या ठिकाणी मुळात सिरपचे जार देण्यात आले. परंतु, कागदोपत्री नोंदवलेल्या आणि प्रत्यक्षातील बाटल्यांमध्ये पुलाची शिरोली येथे ८०, अंबप येथे तब्बल २२०० तर उचगाव येथे ५०० बाटल्यांचा फरक सापडला आहे. त्यामुळेच बिल्ले यांची चंदगड तालुक्यातील अडकूर येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

..तरीही कोल्हापुरातचबिल्ले यांची जरी चंदगड तालुक्यात बदली झाली असली तरी ते तिथे हजर होऊन रजा टाकून कोल्हापूरमध्ये असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाकाळातील काही रेकॉर्ड तयार करण्यासाठी राजीनामा दिलेल्या ‘डॅम’सोबत सीपीआरमध्ये कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असल्याची जोरदार चर्चा जिल्हा परिषदेत सुरू झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद