शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

नगरसेवकांचे प्रबोधन गरजेचे

By admin | Published: June 18, 2015 12:04 AM

इचलकरंजी नगरपालिका : कारभाऱ्यांनी प्रशिक्षण वर्ग घ्यावेत; नागरिकांची अपेक्षा

राजाराम पाटील - इचलकरंजी --नगरपालिकेत असलेल्या समन्वयाच्या अभावामुळेच नगरसेवकांत होणारे राडाचे प्रसंग घडत आहेत. वास्तविक पाहता नगरपालिकेचे कामकाज चालविणाऱ्या नेतृत्वाने यावर नियंत्रण ठेऊन संबंधितांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. नगरपालिका म्हणजे विकास-विधायक कामाचे केंद्र आणि नागरी सेवा-सुविधा पुरविण्याचे ठिकाण असल्याचे सांगण्याची आवश्यकता आहे.साधारणत: शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या इचलकरंजी नगरपालिकेला जसा इतिहास आहे, तसे ऐतिहासिक महत्त्वही आहे. स्वातंत्र्योत्तर काळात पहिले नगराध्यक्ष कै. बाळासाहेब चिवटे यांच्यानंतर अनेक दिग्गजांनी नगरपालिकेचे नेतृत्व केले. त्यामध्ये कै. पी. टी. कणसे, कै. रामभाऊ जगताप, कै. सदाशिवराव मुरदंडे, कै. सदाशिवराव सुलतानपुरे, कै. श्रीपतराव वडिंगे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आदींचा समावेश आहे. तर अशोकराव आरगे, अशोकराव जांभळे, शंकरराव पुजारी, रामकुमार मर्दा, हिंदुराव शेळके, राजीव आवळे, संजय आवळे, आमदार सुरेश हाळवणकर, किशोरी आवाडे, मेघा चाळके, आदी मान्यवरांनी नगराध्यक्षपद आणि नेतृत्वाची धुरा वाहिली आहे.नगरपालिकेमध्ये पूर्वीपासूनच राजकीय पक्षांच्या झेंड्याखाली निवडणुका लढविण्याची परंपरा आहे. निवडणुकीनंतर सर्वच पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेऊन शहराच्या विकासासाठी एकत्रित येतात. एकजुटीने, एकसंघपणे दिशा ठरवून प्रगती साधली जाते. त्याकाळी वाद-विवाद होत असत; पण ते पालिका सभागृहात आपापल्या परीने नोंदविले जात. सभागृहात शाब्दिक चकमक, कागदांची फेकाफेक, माईकची आदळआपट होई; पण सभागृहाबाहेर एकदिलाने कामकाज चालविले जाई.अशा परंपरेला अलीकडील काळात मात्र गालबोट लागत आहे. काही नगरसेवकांच्या आग्रहाच्या अतिरेकामुळे वादाचे प्रसंग घडू लागले आहेत. नगरसेवक विरूद्ध नगरसेवक आणि नगरसेवक विरूद्ध प्रशासन असे संघर्ष होत असताना टोकाची भूमिका घेतली जात आहे. शिवीगाळ, हाणामारी, रेटारेटी अशा घटनांमुळे नगरपालिकेच्या पावित्र्याला तडा जाऊ लागला आहे. त्यामुळे पालिकेचे नेतृत्व करणाऱ्या कारभाऱ्यांनी आता आत्मकेंद्रित होऊन विचार करावा. नगरसेवकांचे प्रबोधन करावे. जेणेकरून नगरपालिकेची विस्कटलेली घडी पुन्हा बसून विकास-प्रगती साधत, शहराचे हित जोपासत कामकाज चालवावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. गोपनीय अहवालाची चर्चानगरपालिकेत काही नगरसेवक मक्तेदार असल्याचा मोठा बोलबाला आहे. त्यामुळे पालिकेची घडी विस्कटली. कामांचा दर्जा ढासळला. ‘टक्का’ संस्कृती बोकाळली. परिणामी नगरपालिकेत कमालीचा गोंधळ वाढीस लागला. याची दखल घेत एक महिन्यापूर्वी खुद्द आमदार सुरेश हाळवणकर यांनी नगरपालिकेत येऊन झाडाझडती घेतली. त्यावेळी मुख्याधिकारी सुनील पवार यांनी मक्तेदार नगरसेवकांचा गोपनीय अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवा, असे सूचविले. त्याचीही विचारणा नागरिकांतून होत आहे.