शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

कोल्हापूरात बालकांवर अनैसर्गिक अत्याचार करणा-या आरोपीस न्यायालयाने ठोठावली जन्मठेप 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2017 7:37 PM

कणेरी (ता. करवीर) येथील दोन बालकांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे दोषारोपपत्र सिध्द झाल्याने सत्र न्यायाधिश ए. यु. कदम यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा शनिवारी सुनावली.

कोल्हापूर - कणेरी (ता. करवीर) येथील दोन बालकांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे दोषारोपपत्र सिध्द झाल्याने सत्र न्यायाधिश ए. यु. कदम यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा शनिवारी सुनावली. प्रकाश संभाजी कुंभार (वय ३७, रा. पेड, ता. तासगाव, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. 

अधिक माहिती अशी, फिर्यादी कणेरी येथे राहत असून त्यांचे सोबत त्यांचा मुलगा, सून, नात एकत्र राहतात. त्यांचा मोठा मुलगा नोकरीनिमित्त बाहेरगावी राहणेस आहे. त्यांचा नातू कोल्हापूर येथे सहावीत शिक्षण घेत होता. त्यांच्या मुलीचा मुलगाही कोल्हापूरात शिक्षण घेत असल्याने दोघेजण परिक्षेनंतर आजोबांकडे राहण्यासाठी आले होते. मुलगीने वडीलांच्या घराशेजारीच नवीन घरे बांधले आहे. त्या मोरेवाडी येथे राहत असल्याने त्यांनी हे घर आरोपी प्रकाश कुंभार याला भाड्याने दिले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने रात्री फिर्यादी हे दोघा नातवांना घेवून टेरेसवर झोपत होते. कुंभार हा देखील काहीवेळेसाठी टेरेसवर झोपून पुन्हा घरी जात होता. 

दरम्यान ११ एप्रिल २०१४ रोजी रात्री जेवण करुन दहाच्या सुमारास दोघेही मुले आजोबासोबत टेरेसवर झोपण्यासाठी गेले. यावेळी आरोपी कुंभारही झोपण्यासाठी आला. रात्री अकराच्या सुमारास आजोबा लघुशंकेसाठी टेरेसवरुन खाली गेले. काही वेळाने ते परत वरती आले असता दोघेही नातू झोपलेल्या ठिकाणी नव्हते. कुंभार याचेकडे चौकशी केली असता दोघेही बाथरुमसाठी खाली गेल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर दूसºयादिवशी फिर्यादीच्या मुलीच्या मुलाने फोन लावून आम्हाला कोल्हापूरला घेवून जा, तुला काहीतरी सांगायचे आहे असे म्हणून आईला बोलवून घेतले. 

त्यानंतर दोघांनीही कुंभार याने केलेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानुसार २४ एप्रिल रोजी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात नराधम कुंभार याचे विरोधात गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक टी. बी. राठोड यांनी याप्रकरणी तपास पूर्ण करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या गुन्ह्याची सुनावणी सत्र न्यायाधीश कदम यांचेसमोर झाली. सरकारी वकील सुजाता इंगळे यांनी गुन्हा शाबित करण्यासाठी दहा साक्षीदार तपासले. या सर्व साक्षी ग्राह्य धरुन आरोपीची विकृत मनोवृत्ती व वय विचारात घेवून हे कृत्य समाजाच्या दूष्ठीने घातक आहे. या सर्व युक्तीवादाचा विचार करुन त्याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

टॅग्स :Crimeगुन्हा