कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने शहरातील कोविड-१९ लसीकरणाची व्याप्ती वाढविली असून, लसीकरणासाठी २६ केंद्रे सुरू केली आहेत. सध्या कोल्हापूर शहरात ६० वर्षांवरील वृद्ध नागरिक, तसेच ४५ ते ५९ वयोगटाचे व्याधीग्रस्त नागरिक यांच्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
ही लस सरकारी व खाजगी रुग्णालयात उपलब्ध असून, सरकारी रुग्णालयात व महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामधून लस मोफत देण्यात येत आहे, तर खासगी रुग्णालयात २५० रुपये नाममात्र शुल्क आकारण्यात येत आहे. लस टोचून घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
लसीकरण केंद्रे (सरकारी) - आरोग्य केंद्र क्र.१ सावित्रीबाई फुले, आरोग्य केंद्र क्र. २ फिरंगाई, आरोग्य केंद्र क्र. ३ राजारामपुरी, आरोग्य केंद्र क्र. ४ पंचगंगा, आरोग्य केंद्र क्र. ५ कसबा बावडा, आरोग्य केंद्र क्र. ६ महाडिक माळ, आरोग्य केंद्र क्र.७ आयसोलेशन हॉस्पिटल, आरोग्य केंद्र क्र. ८ फुलेवाडी, आरोग्य केंद्र क्र. ९ सदर बाजार, आरोग्य केंद्र क्र. १० सिद्धार्थनगर, आरोग्य केंद्र क्र. ११ मोरे मानेनगर. सीपीआर हॉस्पिटल.
खासगी केंद्रे - ॲपल हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, केपीसी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सिद्धिविनायक नर्सिंग हॉस्पिटल, डायमंड हॉस्पिटल, मगदुम इंडो सर्जरी इन्स्टिट्यूट, सिद्धिविनायक हार्ट हॉस्पिटल, कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक अँड ट्रामा, मसाई हॉस्पिटल, स्वस्तिक हॉस्पिटल, सनराइज हॉस्पिटल, ओमसाई आँको सर्जरी, जोशी हॉस्पिटल अँड डायलेसिस सेंटर, ॲस्टर आधार हॉस्पिटल.