कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने ४५ वर्षांवरील नागरिकांच्या दुसऱ्या डोसचे लसीकरणास प्राधान्य दिले असून सोमवारी शहरातील अकरा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व सीपीआर हॉस्पिटलमध्ये अडीच हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले.
शहरात सोमवारी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले १६६ , फिरंगाई १६०, राजारामपुरी १०५, पंचगंगा १०५, कसबा बावडा १६३, महाडिक माळ ३७७, आयसोलेशन ३४२, फुलेवाडी १७५, सदरबाजार १५९, सिद्धार्थनगर १४९, मोरेमाने नगर १६३ व सीपीआर हॉस्पिटल येथे ३९१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
शहरामध्ये आजअखेर १ लाख ११ हजार ७८३ नागरिकांचे पहिल्या डोसचे तर ३४ हजार १७७ नागरिकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. आजअखेर ४५ वर्षांवरील ४९ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
-यांना मिळेल कोव्हॅक्सिन लस-
आज, मंगळवारी महापालिकेच्या सावित्रीबाई फुले येथे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी दि. ११ मे रोजी ज्यांनी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेली आहे. अशाना कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे. तर कोविशिल्ड लस उपलब्ध नसल्याने वय वर्षे ४५ वरील नागरिकांचे कोविशिल्डच्या पहिल्या व दुसऱ्या डोसचे सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावरील लसीकरण बंद राहील. तसेच १८ ते ४४ वयोगटातील ज्या नागरिकांनी पहिल्या डोस करिता कोविन पोर्टलवर मंगळवारची अपॉईंटमेट घेतली आहे, अशांना भगवान महावीर दवाखाना विक्रम नगर येथे लस दिली जाणार आहे.