कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने व्लादिमिर लेनीन स्मृतिदिनानिमित्त दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचा शुक्रवारी सत्कार करण्यात आला. उमा पानसरे, कामगार नेते बी. एल. बर्गे, अनिल चव्हाण यांच्याहस्ते मानपत्र देऊन शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे म्हणाले, विचाराशिवाय केलेली कृती ही आंधळी असते आणि कृतीशिवाय केलेला विचार हा वांझोटा असतो. हे लेनीनचे जगप्रसिद्ध वाक्य आहे. त्यानुसार भाकपचे कार्यकर्ते दिल्लीतील खडतर आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी खऱ्याअर्थाने कोल्हापूरकरांचा लढवय्येपणाचा, विचारांचा, संघर्षाचा वारसा जोपासला आहे.
उमा पानसरे म्हणाल्या, या लढवय्या कार्यकर्त्यांचा सत्कार करत असताना मला भूतकाळातील आम्ही करत असलेल्या आंदोलनाची आठवण झाली आणि आत्तादेखील कार्यकर्ते त्याच जोमात आणि जोशात कार्यरत आहेत.
दिनकर माने, राणी दिवसे, एन. सी. पाटील, उज्वला कंदले, वार. एन. पाटील, लता जाधव, नामदेव पाटील, भारती मेढे, बाळू पाटील, विमल जाधव, छायाताई नरके, मारुती नलवडे, ज्योतिराम पाटील, जयवंत जोगडे, शिवाजी पाटील, रुक्मिणी नरके आदींचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. नामदेव गावडे, रघुनाथ कांबळे, गिरीश फोंडे, आशा बर्गे, सुमन पाटील, दिलदार मुजावर आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचा शुक्रवारी सत्कार करण्यात आला. नामदेव गावडे, उमा पानसरे, बी. एल. बर्गे, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते. (फोटो-२२०१२०२१-कोल-भाकप) (छाया- आदित्य वेल्हाळ)