शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

माकपचे शुक्रवारी ‘जवाब दो’ आंदोलन

By admin | Published: May 18, 2015 11:43 PM

भाजपच्या आश्वासनांचा होणार ‘पोलखोल’

कोल्हापूर : कोल्हापुरातला टोल रद्द करण्याची घोषणा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येण्यापूर्वी केली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा राजीनामा याच फडणवीसांनी मागितला होता पण आजही कोल्हापुरातील टोल रद्द झाला नाही. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांचे मारेकरी तीन महिन्यांनंतरही सापडलेले नाहीत. कोल्हापूरकरांच्या या प्रश्नांची सोडवणूक करण्यात अपयशी ठरलेल्या फडणवीस सरकारकडे जाब विचारण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे (माकप) कोल्हापुरात शुक्रवारी (दि. २२) भाजप सरकारविरोधात ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती माकपचे जिल्हा सचिव उदय नारकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. नारकर म्हणाले, कोल्हापुरातील टोल रद्द करण्यात आणि पानसरेंच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यात फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी काळा पैसा देशात आणण्याचे, महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते, पण सत्तेत येऊन वर्ष झाले तरी या देशात काळा पैसा आलेला नाही. महागाई दिवसें-दिवस वाढतच आहे. भूसंपादनाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत केल्या जात आहेत. औषधे महागली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल - डिझेलचे दर कमी असले तरी देशातील पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहेत. जाती-धर्मातील तेढ निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘जवाब दो आंदोलन’ होणार आहे. या आंदोलनादरम्यान दसरा चौक ते मिरजकर तिकटी या मार्गावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मिरजकर तिकटी येथे जाहीर सभाही होणार आहे. माकपचे जिल्हा समिती सदस्य चंद्रकांत यादव म्हणाले, भाजप सरकारच्या काळात अन्नधान्याचे दर वाढत आहेत. कामगारांनी संघर्ष करून मिळवलेले कायदे बदललेले जात आहेत. विकासाच्या नावाखाली कॉर्पोरट विकासाला प्राधान्य दिले जात असून कामगार, शेतकरी, शासकीय योजनांत काम करणारे कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. रेशन व्यवस्थाच बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. शासनाचे हे धोरण कामगार, गरीब आणि शेतकरी यांना मारक आहे. यावेळी प्राचार्य ए. बी. पाटील, अ‍ॅड. जयंत बलुगडे, प्रा. आबासाहेब चौगले, शंकर काटाळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)टोल रद्द करून मते मिळवलीत, टोल कधी रद्द होणार ?ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला तीन महिने झाले. पानसरेंच्या खुन्यांना कधी पकडणार?दाभोलकरांच्या खुन्यांना कधी पकडणार?ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे दर का देत नाही?गोवंश हत्याबंदी कायदा करून कोणाला खूश करत आहात?एक वर्षात किती काळा पैसा देशात आणला?डिझेल-पेट्रोलचे भाव का वाढवले जात आहेत?महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन महागाई का कमी केली नाही?