शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

पैसे द्या, फाइल नंबर सांगा, काम होईल: कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांत पाडला जातो ढपला 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 5:34 PM

भक्त भेटेल तशी दक्षिणा..

दीपक जाधवकोल्हापूर : जिल्हा रुग्णालयातील स्थायित्व प्रमाणपत्रांसाठी सीपीआरमधील परिचारिकेकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना वरिष्ठ लिपिक पकडला गेल्यानंतर नेमणूक ग्रामीण रुग्णालयात पण काम सीपीआरमध्ये करणाऱ्याची चौकशी होणार का, अशी विचारणा होत आहे. याठिकाणी असणारी साखळी कोण तोडणार, असा प्रश्न शासकीय कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे. ‘फक्त पैसे द्या व नाव आणि फाइल नंबर सांगा, काम होऊन जाईल’ अशी साखळी तिथे घट्ट झाल्याची चर्चा आहे.जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक हुसेनबाशा शेख याला लाचलुचपतने अटक केली. शासकीय कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले त्याचबरोबर वैद्यकीय रजा, नोकरीसाठी अवश्यक फिटनेस प्रमाणपत्रासाठी कर्मचाऱ्यांना सीपीआरमध्ये यावे लागते. वैद्यकीय बिलाची फाइल ही दारावरील पहिलवान लिहून परस्पर सही घेतो.

एका ग्रामीण रुग्णालयातील शिपाई सर्वांचा लाडका 'मंत्री' रोज अशा कर्मचाऱ्यांकडून फायली गोळा करून सीपीआरमध्ये आणून देतो. लिपिक कोणत्याही फाइल करत नाही. ही साखळीच करते. बाहेरच्या बाहेर सफाई कर्मचारी व दारावरील पहिलवान फायली लिहितो. यासाठी स्वतंत्र लिपिक नाही. फक्त कागदोपत्री शेख याच्याकडे टेबल होते.शल्यचिकित्सकाच्या केबिनबाहेर रोजंदारीवरील दिलीप हा सफाई कर्मचारी नेमला असून, शल्यचिकित्सकांना भेटण्यासाठी वर्ग एकच्या डाॅक्टरांनादेखील त्याची परवानगी घ्यावी लागते. बिलाच्या फायलीचे आदेश हा दारावरील पहिलवानच करतो. त्याला डीएमआरचा दिलीप मदत करत असून, चार वर्षांपूर्वी निवृत्त झालेला चलाख 'खोपडी'चा शिपाई अजूनही बिलाच्या फायली गोळा करून सीपीआरमध्ये रोज येतो.

खुपिरेचा मंत्री हा नेमणूक ग्रामीण रुग्णालयात असून दिवसभर वैद्यकीय बिलाची सुपारी घेऊन सीपीआरमध्येच असतो. त्याच बरोबर पदोन्नती होऊनही जिल्हा न सोडलेला मनोजही तासन्तास सीपीआरमध्ये असतो. एका लिपिकाची बदली आरोग्य उपसंचालक कार्यालयात झाली असून त्याने वरिष्ठांकडे 'उत्तम' प्रयत्न करून आठवड्यातील दोन दिवस आपली प्रतिनियुक्ती वैद्यकीय बिलाच्या फाइलसाठी सीपीआरमध्ये करून घेतली.

चहापेक्षा किटली गरम..जिल्हा रुग्णालयात सध्या शासकीय कर्मचारी संख्या कमी असून शासनाने रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची भरती मोठ्या प्रमाणावर केली असून, याच रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांचा रुबाब जास्त आहे.भक्त भेटेल तशी दक्षिणा..तीन लाखांपर्यंतची बिले ही जिल्हा शल्यचिकित्सकाच्या अधिकारात येत असून, बिलाच्या फाइलवर मंजूर आदेश झाला की त्याची फी म्हणून शासनाला दोन टक्के फी भरून रीतसर पावती घेतली जाते. मात्र, दारावरील पहिलवान हा समोरच्या कर्मचाऱ्याने हे कितपत खरे केले आहे ते बरोबर ओळखतो आणि मग तो दोन टक्क्यांपासून ते दहा टक्क्यांपर्यंत दक्षिणा घेतो.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल