कोल्हापूर : सीपीआरमधील आरोग्य सेवेबाबत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठुळे यांना दिलेल्या २० प्रश्नांचे काय झाले, याचा सोमवारी (दि. २) जाब विचारण्याचा निर्णय सीपीआर बचाव कृती समितीच्या बैठकीत आज, गुरुवारी घेण्यात आला. समितीचे निमंत्रक वसंतराव मुळीक अध्यक्षस्थानी होते. यावेळी कार्यकर्त्यांनी कोणत्याही स्थितीत सीपीआर रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा पूर्ववत दर्जा मिळाल्याशिवाय गप्प बसायचे नाही, असा निर्धार केला. प्रा. बी. जी. मांगले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बैठकीस बबन रानगे, संभाजी जगदाळे, किशोर घाटगे, भगवान काटे, दिलीप पवार, महादेव पाटील, बाळासाहेब भोसले, उदय लाड, धनाजी गुरव, बबन सावंत, जयवंत पलंगे, रूपा वायदंडे यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
‘त्या’ २० प्रश्नांचा विचारणार जाब सीपीआर बचाव कृती समिती
By admin | Published: May 30, 2014 1:53 AM