शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

'सीपीआर' बचाव कृती समितीची निदर्शने

By admin | Published: November 18, 2014 10:55 PM

जिल्हाधिकारी कार्यालय : दोन दिवसांत बैठक घेण्याचे विक्रांत चव्हाण यांचे आश्वासन

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या(सीपीआर) विविध समस्यांप्रश्नी पुढील दोन दिवसांत बैठक घेऊ,असे आश्वासन आज, मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी सर्वपक्षीय सीपीआर बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी निदर्शने केली.सीपीआरमध्ये औषधांचा तुटवडा, डॉक्टरांची कमतरता व गैरहजेरी, मेडिकल व डायग्नोस्टिक इन्स्ट्रुमेंटस यांची कमतरता तसेच रुग्णालयातील अनेक उपकरणे आजही बंद अवस्थेत आहेत. जीवनरक्षक लसींचा तुटवडा आहे,असे अनेक प्रश्न आहेत. त्याचबरोबर १ एप्रिल २०११ पासून सीपीआर हे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे गेले आहे. त्यामुळे हे रुग्णालय राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाकडे हस्तांतरित झाले आहे. पूर्वीप्रमाणेच सीपीआरला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा. जिल्हा नियोजन मंडळाच्या समितीमध्ये (डीपीडीसी) सीपीआरसाठी नवीन हेड निर्माण करणे आदी मागण्या केल्या आहेत.सर्वपक्षीय सीपीआर बचाव कृती समितीच्या निदर्शनानंतर समितीचे निमंत्रक वसंत मुळीक यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी चव्हाण यांना शिष्टमंडळ भेटले. यावेळी मुळीक यांनी, यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी सीपीआरप्रश्नी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची संयुक्त बैठक घेण्याचे सांगितले होते. पण, त्यांनी घेतली नाही, असे सांगितले.निदर्शनात बाळासाहेब भोसले, बबन रानगे, संभाजी जगदाळे, बाबा इंदूलकर, दिलीप पवार, दिलीप देसाई, उमेश पोर्लेकर, सुभाष देसाई, किशोर घाटगे, नीलेश लाड, महादेव जाधव, मनोज नरके, अक्षय कांबळे, अजित सासने, आप्पासाो मिसाळ, शिरीष देशपांडे, रघुनाथ कांबळे, डॉ. संदीप पाटील, चंद्रकांत चव्हाण, रूपेश इंगवले, कुमार काटकर, अवधूत पाटील, पद्माकर कापसे, भाऊसाो काळे आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)कोल्हापुरात मंगळवारी सर्वपक्षीय सीपीआर बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याशी वसंत मुळीक यांनी चर्चा केली. शेजारी बबन रानगे, बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, आदी.जिल्हाधिकारी यांच्यासमवेत होणाऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास सीपीआरप्रश्नी विविध मार्गांनी आंदोलन करू- वसंत मुळीक, निमंत्रक सर्वपक्षीय सीपीआर बचाव कृती समिती, कोल्हापूर.