शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

द. महाराष्ट्रात महागड्या गाड्यांची क्रेझ

By admin | Published: August 04, 2016 1:11 AM

उदय लोखंडे : टोल संकल्पनाच बंद करायला हवी, एकच रोड टॅक्स हवा

साऊथ महाराष्ट्र आॅटोमोबाईल डिलर असोसिएशनची नुकतीच सातारा येथे बैठक झाली. या बैठकीत साऊथ महाराष्ट्र आॅटोमोबाईल डिलर असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोल्हापूरच्या ट्रेन्डी व्हीलचे अध्यक्ष उदय लोखंडे यांची निवड करण्यात आली. या बैठकीला कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतील डिलर सहभागी झाले होते. आॅटोमोबाईल डिलर असोसिएशनच्या अडचणी व आॅटोमोबाईल क्षेत्राबाबतची सध्याची स्थिती मांडली. टोल संकल्पनाच बंद करून एकदाच रोड टॅक्स करावा, असे परखड मत त्यांनी ‘लोकमत’च्या थेट संवादात मांडले. प्रश्न : गाडी पंधरा वर्षांनंतर स्क्रॅप करावी का?उत्तर : कोणत्याही गाडीचे आयुष्य हे पंधरा वर्षे असते. त्यानंतर गाडीचे काम निघते. गाडी धूर सोडायला लागते. प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो; म्हणूनच विदेशात पंधरा वर्षांनंतर गाडी स्क्रॅप केली जाते आणि भारतातही दिल्लीमध्ये ही संकल्पना राबविली जात आहे. भविष्यात सर्वत्र ही संकल्पना येईल. गाडी ही चैनीची वस्तू नसून गरज बनली आहे. त्यामुळे बाजारात नवनवीन गाड्या येत आहेत. ग्राहकही दुरुस्तीऐवजी एक्स्चेंजवर भर देऊन जुनी गाडी देऊन नवीन गाडी घेत आहेत. प्रश्न : आॅटोमोबाईलची सध्याची परिस्थिती काय आहे ? उत्तर : आॅटोमोबाईल क्षेत्राला गेल्या दोन-तीन वर्षांत मोठी मंदी होती. मागणीच नव्हती. कोल्हापूर, सांगली, सातारा हा भाग शेती आणि पाऊस यावरच प्रामुख्याने अवलंबून आहे. गेल्या तीन वर्र्षांत पावसाचे अल्प प्रमाण झाले होते. गेल्या वर्षी तर संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे याचा परिणाम गाड्या खरेदीवर झाला. गाड्यांची विक्री थंडावली होती. पण गेल्या एप्रिल महिन्यापासून परिस्थिती थोडी सुधारली आहे. गाड्या खरेदीबाबत लोकांचे मनपरिवर्तन होत आहे. त्यात आता चांगला पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांची पिके चांगली येतील. शेतकऱ्यांकडे पैसे आले की विक्री आपोआपच वाढते. त्यामुळे चालू वर्षांपासून आॅटोमोबाईल मार्केट निश्चितच चांगले सुधारेल आणि गाड्यांची विक्री वाढेल.प्रश्न : ग्राहक गाडी खरेदी करताना कोणता विचार करतो?उत्तर : ग्राहक गाडी खरेदी करताना त्या गाडीची किंमत, मेन्टेनन्स, सुटे भाग, तत्काळ कर्ज उपलब्ध या गोष्टी पाहतो. आपल्याकडे प्रत्येक सहा महिन्याला विविध कंपनीच्या नवीन दुचाकी आणि चारचाकी गाड्या बाजारात उपलब्ध होत आहेत. ग्राहकाला चॉईस मिळाला आहे. ज्या गाड्यांची किंमत कमी आहे. आकर्षक योजना आहेत. गाडीचा मेन्टेनन्स कमी आहे. कमी कागदपत्रात तत्काळ फायनान्स उपलब्ध होतो तिकडे ग्राहक वळतो. आणि प्रामुख्याने गाडी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकाला सेवा देणे हे महत्त्वाचे ठरते. प्रश्न : डिलरांना कोणत्या अडचणी येतात.उत्तर : साऊथ महाराष्ट्र आॅटोमोबाईल डिलर असोसिएशनच्या अंतर्गत कोल्हापूर डिस्ट्रीक्ट असोसिएशन, सांगली डिस्ट्रीक्ट असोसिएशन आणि सातारा डिस्ट्रीक्ट असोसिएशन या तीन जिल्हास्तरीय असोसिएशन येतात. तीन जिल्ह्यांत दुचाकी, चारचाकी, हेवी व्हेईकलचे शंभरहून अधिक डिलर आहेत. प्रामुख्याने गाड्यांचे पासिंग लवकर झाले पाहिजे. पासिंग प्रक्रिया खूप किचकट आहे. ती सुलभ झाली पाहिजे. पासिंग वेळेवर झाले नाही की नंबर वेळेवर मिळत नाही. ग्राहक नाराज होतो. मग विना पासिंग गाडी फिरवली आणि पोलिसांना सापडली तर मोठा दंड आकारणी केली जाते. कायद्याचा अर्थ वेगवेगळा काढला जातो. त्यामुळे पासिंग लवकर होणे गरजेचे आहे. कंपन्यांचे प्रेशर असते गाड्यांची विक्री करण्यासाठी. त्यामुळे मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. पण या सर्वांवर असोसिएशनच्या माध्यमातून योग्य तोडगा काढला जातो. प्रश्न : गाड्या चालवताना कोणती सुरक्षा बाळगायची ? उत्तर : दुचाकी चालवताना चाळीसची स्पीड मर्यादा असली पाहिजे, दुचाकीस्वाराने हेल्मेट स्वत:च्या सुरक्षेसाठी घातले पाहिजे. वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. चारचाकी गाडी चालवताना सीटबेल्ट लावूनच गाडी सुरू केली पाहिजे. गाड्यांची स्पीड मर्यादा ८0च्या वर नसावी, टायरमधील हवा तपासली पाहिजे. गाडीचे सर्व्हिसिंग वेळेवर केले पाहिजे. गाडी चालवताना मोबाईलचा वापर टाळला पाहिजे. गाडी चालवताना मद्यप्राशन करू नये.प्रश्न : वर्षाला गाड्यांची विक्री किती होते ?उत्तर : कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतून दुचाकी, चारचाकी, ट्रक, बॅक हो लोडर आणि हेवी व्हेईकल अशी चार लाखांवर विक्री होते.प्रश्न : रस्त्यांवरील टोलबाबत आपले मत काय?उत्तर : संपूर्ण भारतात सर्वांत जास्त टोल हा महाराष्ट्रात आकारला जातो. मुंबईला जायचे म्हटले तरी किमान हजार रूपये टोल भरावा लागतो. हे लहान चारचाकी गाड्यांचे झाले. पण मोठ्या हेवी व्हेईकल गाड्यांना जास्त टोल बसतो. टोल ही संकल्पनाच मुळात काढून टाकली पाहिजे. त्याऐवजी एकच रोड टॅक्स आणला पाहिजे आणि तोही गाडी खरेदी करताना एकदाच भरून घेतला पाहिजे. टोलमुळे हेवी व्हेईकल आणि ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. पण एवढा टोल भरूनही महाराष्ट्रातील रस्ते मात्र खूपच खराब आहेत. आपल्या शेजारच्या कर्नाटक राज्यात कितीतरी पटीने चांगले रस्ते आहेत.प्रश्न : दक्षिण महाराष्ट्राला महागड्या गाड्यांची भुरळ आहे का?उत्तर : हो, कोल्हापूर, सांगली, सातारा या दक्षिण महाराष्ट्रातील ग्राहक हौशी आहे. भारतात कोणतीही गाडी आली आणि ती या दक्षिण महाराष्ट्रात नाही असे कधी झालेले नाही. नवीन गाडी आली की कोल्हापूर, सांगली, सातारा येथील लोकांचे बुकिंग ठरलेले असते. अनेक गाड्यासाठी वर्ष-वर्षभर वेटिंगला थांबतात पण आलिशान आणि महागड्या गाड्या घेतात. येथील लोक हौशी आहेत आणि महागड्या गाड्यांची याठिकाणी क्रेझ आहे. गाड्यामध्ये आता कलर कॉम्बीनेशन आले आहे. विविध कलरमध्ये गाड्या रस्त्यावर फिरवताना दिसत आहेत.- सतीश पाटील