कोल्हापूर : जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास काय उपाययोजना करायच्या याचा १५ दिवसात गावनिहाय आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करा, बचावाचे साहित्य तयार ठेवा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात अभूतपूर्व असा पूर आला होता. गतवर्षी धरणातील पाणीसाठ्याचे योग्य नियोजन केल्याने संभाव्य पूर टाळता आला. त्याच पार्श्वभूमीवर या वर्षीसाठीदेखील नियोजन करा. पूर आला तर कोणकोणत्या उपाययोजना करायच्या, नागरिकांचे स्थलांतर कुठे करायचे, बचावासाठीच्या बोटीसह सर्व साहित्यांची तपासणी करून ते तयार ठेवा, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
--
जवानांचे लसीकरण
आपत्ती व्यवस्थापनांतर्गत जिल्ह्यात ९०० आपदा मित्र व आपदा सखी या जवानांची टीम कार्यरत आहे. या जवानांचे तातडीने लसीकरण करून घेण्यात येणार आहे.
--