शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

समताधिष्ठित समाज घडवूया

By admin | Published: April 19, 2017 1:13 AM

शरद गायकवाड यांचे प्रतिपादन : मूलनिवासी मेळाव्यात प्रबोधन सत्र

कोल्हापूर : महापुरुषांच्या स्वप्नातील समताधिष्ठित समाज घडविण्यासाठी आपण सर्वांनी वेळ, पैसा, श्रम आणि बुद्धी खर्च करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. शरद गायकवाड यांनी मंगळवारी येथे केले.येथील मूलनिवासी संघातर्फे राष्ट्रपिता जोतिबा फुले यांची १९० वी आणि राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित मूलनिवासी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. रवींद्र श्रावस्ती, तर प्रा. प्रभाकर निसर्गंध प्रमुख उपस्थित होते. मेळाव्यातील प्रबोधन सत्राचा विषय ‘समता नाकारण्यासाठी समरसतेचे ढोंग’ असा होता. प्रा. गायकवाड म्हणाले, देशाला क्रांती, प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. महापुरुषांनी क्रांती केली, तर प्रतिक्रांतीने महापुरुषांच्या विचारांचे अपहरण केले. समतावादींचा विषमतावादीकडून छळ झाला. समताधिष्ठित समाज निर्माण करणे हे महापुरुषांचे स्वप्न होते. त्यासाठी ते आयुष्यभर झटले. त्यांचे विचार, तत्त्वज्ञान, वस्तूंचे अपहरण केले जात आहे. त्यामुळे या देशात क्रांती-प्रतिक्रांती दिसत आहे. समताधिष्ठित समाज घडविण्यासाठी वेळ, पैसा, श्रम, बुद्धी खर्च करूया. शिवाय समता, न्याय, बंधुभाव रुजलेला समाज घडूवया. कार्यक्रमाच्या प्रारंभी कुमार कांबळे यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. प्रमोद कोल्हे यांनी काव्यवाचन केले. यावेळी राजू कांबळे, मूलनिवासी संघाचे एसईसी सदस्य तुषार गवळी, आदी उपस्थित होते. मूलनिवासी संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप वायदंडे यांनी प्रास्ताविक केले. राहुल ढाले यांनी सूत्रसंचालन केले. बामसेफचे जिल्हाध्यक्ष एस. के. धनवडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)सामाजिक संस्थांचा सत्कारया मेळाव्यात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सामाजिक चळवळीतील संस्थांना ‘मूलनिवासी लढा सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये बौद्ध प्रणाली चॅरिटेबल ट्रस्ट, समविचारी परिवर्तन मंच, नालंदा अकॅडमी, प्रज्ञा प्रकाशन, धम्म संस्कार केंद्र, बहुजन हिताय वसतिगृह, भरारी एज्युकेशनल अ‍ॅण्ड सोशल फौंडेशन, महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ, कोल्हापूर महानगर माध्यमिक शिक्षक संघ, आम्ही कोल्हापुरी, कास्ट्राईब कोल्हापूर, बुद्धभूषण या संस्थांचा समावेश होता. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते.वाचणे सुरू व्हावेसध्या महापुरुषांच्या जयंतीदिनी डॉल्बीवर नाचणे सुरू झाले आहे. ते बंद होऊन समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी वाचणे सुरू व्हावे, अशी अपेक्षा प्रा. गायकवाड यांनी व्यक्त केली.