शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

फ्रान्समध्ये घडवितोय ई- कॉमर्समध्ये भविष्य --

By admin | Published: October 04, 2015 11:32 PM

कोल्हापूरच्या अमित चौगुले ची यशोगाथा-- ग्लोबल कोल्हापूर

आंतराष्ट्रीय स्तरावरील अनुभव व उच्च शिक्षणासाठी अमित अशोक चौगुले याने २०११ ला फ्रान्सला जिद्दीने प्रयाण केले. उच्च शिक्षणानंतर तेथे नोकरीमध्ये यश मिळविले.त्याला भविष्यात कोल्हापुरात स्वत:चे अस्तित्व दाखवायचे आहे.अमित अशोक चौगुले याने भारती विद्यापीठमध्ये पदवीचे शिक्षण व पुण्यातील नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर उच्च शिक्षण व नोकरीसाठी फ्रान्सला जाण्याचा निर्णय घेतला. फ्रेंच भाषा अवगत करून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोकरी तसेच व्यवसायाचा अनुभव मिळविला. याच अनुभवाच्या आधारे भविष्यकाळात कोल्हापुरातच 'ई-कॉमर्स' व्यवसायाची सुरुवात करण्याचा मानस असल्याचे अमितने स्पष्ट केले.अमितचे वडील अशोक चौगुले हे बँक आॅफ इंडियात कार्यरत असल्याने त्यांना अनेकजण परदेश दौऱ्यावर जात असल्याची माहिती होती. अमितने २०११ ला फ्रान्सला प्रयाण केले. त्याला सुरुवातीला फ्रेंच भाषा येत नव्हती. फक्त ‘बोन्जोर (नमस्कार) आणि मर्सी (धन्यवाद )’ हे दोनच शब्द माहीत होते. या दोन शब्दांच्या जोरावर अनोख्या देशात प्रवेश केला. तिकडे इमिग्रेशनपासून ते घर शोधताना तसेच दुकानातून सामान घेतानाही एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे फ्रेंच लोकांचे त्यांच्या भाषेवरचे अतूट प्रेम. कुठेही गेले तरी फ्रेंच भाषा वापरण्यावरच त्यांचा आग्रह असायचा आणि ते इतरांनासुद्धा इंग्रजीऐवजी मातृभाषा वापरण्यासाठी प्रोत्साहन देतात. अमित सांगतो, उत्तर फ्रान्सच्या लिल्ल शहरात माझे कॉलेज होते. जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या साधारण १८ देशांतील ५०-६० हुशार मुला-मुलींनी भरलेल्या त्या वर्गात दचकत दचकतच प्रवेश केला; पण वर्षभरातच तिथे पॅरिसमध्ये कोल्हापुरात जसे गल्लीतले, चौकातले मित्र भेटतो, तसे राहू लागलो. सुरुवातीच्या काळात एक-दोन महिने घरी न सांगता एका रेस्टॉरंटमध्ये काम केले. एक-एक युरोची किंमत तिथे कळत होती. गिरीश, विनीत, नवीन, हेमलतासारखे जीवलग मित्र-मैत्रीण मला येथेच भेटले. त्यांनी मला त्या काळात खूपच मौलाची मदत केली. धीर दिला. उच्च शिक्षण व फ्रान्समधील प्रशिक्षण संपविले. त्यानंतर नोकरी शोधण्यासाठी मी आणि काही भारतीय मित्र आम्ही ‘करिअर फेयर’ करण्याचे ठरविले. तेव्हा फ्रान्समधल्या सर्व शहरांतल्या विद्यार्थी आणि इतर भारतीयांची ओळख यातून झाली. कॉलेज आणि इंटर्नशिपचे दिवस अगदी मजेत गेले; पण खरी परीक्षा यापुढे होती.पुढे तिथे नॉमंर्डीमधेच सहा महिन्याची इंटर्नशिप करण्याची संधी घेतली. इंटर्नशिप संपवून नोकरीचा शोध सुरू केला. व्हिसा संपायच्या आठ दिवस आधी जगातल्या सगळ्यात मोठ्या ‘ई-कॉमर्स’ क्षेत्रातल्या ‘रॉकेट इंटरनेट’ या कंपनीमध्ये मला नोकरी मिळाली. मेहनत, प्रामाणिकपणा व एकाग्रता जपत अखेर त्याच कंपनीत जिद्दीच्या जोरावर प्रमोशनही घेत उच्च पदापर्यंत यश मिळविले. तेव्हा मात्र आजवर केलेला संघर्ष, धडपड सार्थक झाल्याचे वाटले. अडचणीच्यावेळी मित्रांनी केलेली मदत आणि दिलेला धीर यामुळेच हे यश मिळवू शकलो याची जाणीवही झाली. माझ्यासारखेच २० ते २५ भारतीय तरुण, तरुणी पॅरिसमध्ये या कंपनीत चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. केवळ स्वकौशल्यावरच आपल्याला यश व प्रगती साधायला लागते हे मात्र खरे. फ्रान्समधील लोक प्रेमळ, मदतगार वाटले. भविष्यात कोल्हापूरमध्ये ‘ई-कॉमर्स’ व्यवसायाची सुरुवात करण्याचा मानस असून, जे पॅरिसला जाऊ इच्छितात, त्यांना तेथील शिक्षण, जीवनशैली याबाबत मार्गदर्शन करण्याचा उद्देश असल्याचे अमितने स्पष्ट केले. ’’’ - शेखर धोंगडे-