आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी,दि. ३ : सी वर्ल्ड प्रोजेक्टच्या माध्यमातून सिंधुदुर्गचे नाव जगाच्या नकाशावर येणार आहे. हा प्रकल्प स्थानिकांना आर्थिक परिवर्तनाची सुवर्णसंधी आहे. या संधीचे तोंडवली ग्रामस्थांनी सोने करावे, या प्रकल्पाला विरोध न करता या आलेल्या संधीचा लाभ घेऊन आर्थिक स्थैर्यांच्या दिशेने वाटचाल करावी. हा प्रकल्प ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच पूर्ण केला जाईल अशी ग्वाही पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी तोंडवली ता. मालवण येथे र् ंदिली.
तोंडवली येथील वाघेश्वर मंदिरात आयोजित ग्रामस्थांच्या बैठकीत पर्यटन मंत्री रावल बोलत होते. यावेळी व्यासपिठावर पालकमंत्री दीपक केसरकर, आशुतोष पेडणेकर, सरपंच प्रतिक्षा पाटील, प्रमोद जठार, राजन तेली, संदेश पारकर, महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडाळाचे व्यवस्थापकीय संचालक गोविंदराज, सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, सुबोध किन्हळेकर, जगदीश चव्हाण, दीपक माने, प्रातांधिकारी सूर्यवंशी, उपसरपंच संजय केळूसकर, तहसिलदार रोहीणी रजपूत तसेच तोंडवली ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग पर्यटनाला मोठी चालना मिळण्याबरोबरच तोंडवली परिसरातील स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट करुन रावल म्हणाले, की हा प्रकल्प साकारण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे.
पालकमंत्री दीपक केसरकर यावेळी म्हणाले की, तोंडवली गावच्या अडी- अडचणी बाबत प्रशासन व ग्रामस्थांच्या चचेर्तून सर्व समस्याचे निराकरण केले जाईल. रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, धूप प्रतिबंधक बंधारे या बाबत आवश्यक निधी दिला जाईल. प्रारंभी ग्रामस्थांच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.