इचलकरंजी : येथील बीएसएनएल कार्यालयाजवळील शिवाजीनगर परिसरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंगचा जुगार घेणाऱ्या एकास कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. संतोष कृष्णा कुकडे (वय ४१) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून टीव्ही, पाच मोबाईल व इतर साहित्य असा ४४ हजार १६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कुकडे हा स्वत:च्या घरामध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेत असल्याची माहिती पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव यांना मिळाली. त्यानुसार बुधवारी (दि. २२) पथकाने छापा टाकला. त्यावेळी दिल्ली कॅपिटल विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या क्रिकेट सामन्यावर फोनद्वारे बेटिंग घेत असताना संतोष आढळला. त्याला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
फोटो ओळी
२३०९२०२१-आयसीएच-०५-संतोष कुकडे