शहरं
Join us  
Trending Stories
1
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
2
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
3
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
4
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
6
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
7
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
9
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
12
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
13
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
14
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
16
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
17
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
18
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
19
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
20
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!

गांजाच्या झुरक्यात गुन्हेगारीची ‘नशा’-निर्जन कोपरे बनत आहेत टोळक्यांचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 10:39 AM

सकाळी एकत्र यायचे, निर्मनुष्य कोपऱ्यात किंवा एखाद्या पडक्या घरात गांजाचे चार झुरके मारायचे, अंगात नशेची झिंग संचारली की मैदान अगर उद्यान शोधून कुठंतरी निपचीत पडायचे, नाहीतर सैरभैर होऊन गल्लीत किंवा परिसरात हत्यारांसह गोंधळ माजवून एखाद्याचा डाव काढायचा हेच चित्र शहरातील काही भागांत दिसत आहे.

ठळक मुद्देअनेक तरुण व्यसनाधीन : कोल्हापूर पोलिसांची डोळेझाक

तानाजी पोवार ।कोल्हापूर : लॉकडाऊन काळात एकवेळ जीवनावश्यक वस्तू मिळताना अडचणी येतील; पण नशा चढविणारा गांजा मात्र शहरात सध्या पावलोपावली मिळत आहे. कर्नाटकसह मिरज येथून मोठ्या प्रमाणात गांजा कोल्हापुरात छुप्या मार्गाने येत आहे. त्यामुळे मिसरुडही न फुटलेली युवा पिढी वाया जात आहे. नशेत अनेक मोठे गुन्हे त्यांच्या हातून घडत आहेत. पोलीस यंत्रणाही यात निष्प्रभ ठरत आहे. त्यामुळे या गांजा विक्रीवर लगाम घालणार कोण, असा प्रश्न उभा राहिला आहे.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात रोज गांजाची हजारो रुपयांची विक्री होत असल्याचे चित्र आहे, खेळाची मैदाने, निर्जन ठिकाणे, सार्वजनिक उद्याने, उपनगरातील अंतर्गत निर्जन रस्ते ही गांजा ओढत बसण्याची रिकामटेकड्यांची ठिकाणे बनली आहेत. सकाळ झाली की, ठरावीक टोळक्यांचे नियमितपणे येथे गांजाचे झुरके मारण्याचे काम सुरू असते.

गांजाबरोबरच व्हाईटनर, बॉँड, गोगा या पदार्थांचाही दाहक अशा नशेसाठी वापर केला जातो. चार झुरके मारले की, अंगात नशेची झिंग चढते, निर्जनस्थळीच निपचीत पडायचे नाहीत, तर हत्यारांसह गोंधळ माजवायचा, वाहनांची तोडफोड करायची हाच यांचा उद्योग. गांजाची झिंग चढल्यानंतर आपण काय करतो हे त्यांनाच समजत नाही. दौलतनगरात वारंवार होणारे हल्ले, वाहने पेटविणे, आदी प्रकार त्यातूनच घडत आहेत.

येथील ठिकाणी कारवाई कधी?उद्यान, कठड्यावर, फूटपाथवर अनेक नशेखोर पडलेले दिसतात. याशिवाय पंचगंगा स्मशानभूमी घाट, हुतात्मा पार्क, टाऊन हॉल उद्यान, निर्माण चौक, गोळीबार मैदान, राजाराम बंधारा, लाईन बाजार परिसरात त्र्यंबोली लॉन, आदी ठिकाणी खुलेआम नशेबाज टोळकी गांजाचे झुरके मारताना दिवसभर असतात.

कर्नाटक सीमाहद्द, मिरजमार्गे कोल्हापूर

कर्नाटक सीमाभागातील निपाणी, गळतगा, चिक्कोडीमार्गे मिरज येथील खाजा वस्ती येथे हा गांजा मोठ्या प्रमाणावर येतो. तेथून कोल्हापूर ते मिरज रेल्वेतून काही युवक रोज रेल्वेने सकाळी कोल्हापुरात येऊन दिवसभर काही ठिकाणी गांजा मोठ्या प्रमाणात देऊन पैसे घेऊन सायंकाळी निघून जातात. हे गेली कित्येक वर्षे सुरू असतानाही पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहेत.

याशिवाय सीमाभागातील गडहिंग्लज तालुक्यात बुगडीकट्टी, मुत्नाळ, बसर्गे, हलकर्णी, नांगनूर, खानदाळ या ठिकाणी शेतात इतर पिकांमध्ये काही सरीमध्ये छुप्या पद्धतीने गांजाची शेती केली जात आहे, तसेच त्याची विक्री करणारे मोजकेच एजंट आहेत. लॉकडाऊन काळातही अत्यावश्यक सेवेच्या वाहनातून छुप्या पद्धतीने हा गांजा नियमितपणे पुरविला जातो.

पंचनामे कसले ?महापूर येऊन गेल्यानंतर शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्यासाठी पूर ओसरल्यानंतर कृषी अधिकारी, कोतवाल, तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत प्रत्येक शेतीच्या जागेवर जाऊन पंचनामे केले जातात; पण आजपर्यंत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करताना गांजाची शेती असल्याचे कोठेही आढळल्याचे उदाहरण नाही अगर त्यांच्यावर कारवाई केलेले कोठेही दिसून आलेले नाही.

  • जिल्ह्यात वर्षाला  80 गुन्हे  दाखल होतात 
  • कोल्हापुरात 8 ठिकाणी  गांजा विक्री होते-
  • सीमाभागातील 3 गावातून गांजाची आवक
  • सीमाहद्दीत 6 अंतर्गत गावांत गांजा शेती
टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी