पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, रविवारी (९) सकाळी दहाच्या सुमारास येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना स्वॅब तपासणी कक्षासमोरील वॉचमन गेटनजीक कर्तव्य बजावणारे गृहरक्षक दलाचे जवान विकास कांबळे व सचिन पाटील यांनी खोत यांना त्यांची दुचाकी बाहेर पार्किंग करण्यास सांगितले. त्यावेळी खोत याने अरेरावी करत गळा धरून गृहरक्षक दलाच्या जवानांना धक्काबुक्की सुरू केली.
दरम्यान, गस्ती पथकातील पोलीस कर्मचारी विठ्ठल कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी खोत याला बाजूला करून त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तू कोण मला सांगणार, असे म्हणत त्याने अंगावर धावून कांबळे यांचा गळा धरला. गणवेशावरील त्यांची नेमप्लेट तोडून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्याच्या तावडीतून कांबळे यांना सोडवून घेण्याचा प्रयत्न अन्य कर्मचाऱ्यांनी केला. त्यावेळी खोत याने त्यांनाही शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली.
पोलीस नाईक विठ्ठल कांबळे यांच्या फिर्यादीवरून खोत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड अधिक तपास करीत आहेत.