येथे जागेच्या वादातून अशोकराव माने काॅलेजच्या शिक्षक व शिपाई यांनी जातिवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी वडगाव पोलिसात रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला आहे.
फिर्याद रोहित राजू शिंदे (रा.पेठवडगाव) यांनी दिली. याप्रकरणी अतुल सुतारसह अन्य एकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजाणे करीत आहेत.
अधिक माहिती अशी : वाठार येथे अशोकराव माने कॉलेज परिसरात शिंदे यांचे हॉटेल आहे. या जागेवरून शिंदे आणि माने महाविद्यालयात वाद आहे. बुधवारी सकाळी माने कॉलेजचे सुतार व एकजण हॉटेलसमोर येऊन येथे विजयसिंह माने क्रीडांगण तयार करणार आहे. तुझे हॉटेल काढून घे असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.