गडमुडशिंगी येथील सर्व्हे नंबर ३९७/अ/१, व ३९७अ/२ यामधील १८२००० चौरस फूट (४ एकर २२ गुंठे) इतके क्षेत्र शासकीय मालकीचे आहे. ऑगस्ट २०१० ते २०१५ या कालावधित तत्कालीन सरपंच तानाजी कृष्णात पाटील व ग्रामसेवक शिवाजी परसू कांबळे (एस.पी.) यांनी संगनमताने शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तसेच जिल्हाधिकारी यांचे कोणतेही नामनिर्देश नसताना कोणत्याही नोंदणीकृत खरेदी पत्राशिवाय ग्रामपंचायत वार्षिक सभेत कोणताही ठराव न करता रेडीरेकनरच्या दराने मालक म्हणून वरील सर्व्हे नंबरमध्ये मिळकतीच्या उताऱ्यावर असणाऱ्या नोंदी बदलून आपले नातेवाईक, मित्र, जवळचे कार्यकर्ते यांच्यानावे तयार केले. या मिळकती असेसमेंट उताऱ्याच्या आधारे हस्तांतरित केल्या. याप्रकारे शासकीय जमीन बेकायदेशीररित्या हस्तांतर करून शासनाची व ग्रामस्थांची २० ते २५ कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार अमोल आनंदराव शिरगावे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात केली आहे. अधिक तपास सपोनि दीपक भांडवलकर करीत आहेत.
फसवणूकप्रकरणी माजी सरपंच, ग्रामसेवकाविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:22 AM