शनिवारी (दि. २०) रोजी रात्री अंधार पडल्यानंतर फये गावच्या दिशेने येणारी (एमएच ०९- सीएम ५८८४) ही क्रुझर गाडी शिकेकाई ही दुर्मीळ औषधी भरून घेऊन येत होती. याचा सुगावा लागताच किशोर आहेर यांनी सापळा रचून शिताफीने शेणगावच्या हद्दीतच या वाहनाला अडवले व त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करून वाहन जप्त केले. ते वन विभागाच्या गारगोटी कार्यालयात आणून सोडले.
याचदरम्यान हेदवडे गावाहून शेणगावला विनापरवाना जळावू लाकूड भरून येणारा एक ट्रॅक्टर ( एमएच ०९ एफ जे ५०५७) पकडून जप्त करण्यात आला. या दोन्ही वाहनांवर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत वनक्षेत्रपाल किशोर आहेर, बीट गार्ड सुरेखा लोहार, किरण पाटील, वनरक्षक बजरंग शिंदे, कोंडीबा मलगोंडा, तानाजी माणगावकर, धनाजी डावरे, विलास पोवार यांनी भाग घेतला होता.
आहेर यांनी गारगोटी येथील पदभार सांभाळून केवळ सहा महिने झाले असताना, आतापर्यंत त्यांनी अकरा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यापुढील काळात जो कोणी वनक्षेत्रात गैरकृत्य करेल, त्याच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करणार असल्याचे याप्रसंगी वनक्षेत्रपाल आहेर यांनी सांगितले.
फोटो ओळ
विनापरवाना वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई पथकातील मध्यभागी किशोर आहेर, बजरंग शिंदे, कोंडीबा मलगोंडा, सुरेखा लोहार, किरण पाटील, विलास पोवार आदी.