कोल्हापूर : शेतकरी, कोरोना आदी प्रश्नांवर परिस्थििती हाताळण्यात अपयशी ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचे दहन आंदोलन केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, सचिन चव्हाण यांच्यासह विविध पक्षांच्या एकूण २० जणांवर गुन्हे नोंदवले.
बिंदू चौकात बुधवारी सकाळी मोदी पुतळा दहनप्रकरणी आंदोलन करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन प्रतिबंधित आदेश असताना त्याचा भंग केल्याप्रकरणी हे गुन्हे नोंदवण्यात आले. गुन्हे नोंदवल्यामध्ये विजय देवणे, आर. के. पोवार, कॉंग्रेसचे सचिन चव्हाण, भाकपचे रघुनाथ कांबळे, माकपचे शंकर काटाळे, जनता दलाचे रवींद्र जाधव, लाल बावटाचे अतुल दिघे, शेकापचे संभाजी जगदाळे, आम आदमी पक्षाचे संदीप देसाई यांच्यासह एकूण २० जणांचा समावेश आहे.