कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये अपार्टमेंट, रुग्णालये, कारखाने यासह इतर विविध ठिकाणी बेकायदेशीर खासगी सुरक्षारक्षक पुरविणा-या मंगळवारी तिघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. संशयित प्रवीण विलास शिंदे (रा. जवाहरनगर), शामराव बापू तडवळेकर (४८, रा. पाचगाव, ता. करवीर, मूळ सरुड, ता. शाहूवाडी), गणेश राजाराम पाटील (३५, रा. गणेशनगर, बोंद्रेनगर) अशी त्यांची नावे आहेत. या तिघांवर महाराष्ट्र खासगी सुरक्षारक्षक अधिनियम १९८१ कलम २० मधील १ व २ नुसार गुन्हे दाखल केले.
ही सुरक्षा पुरविण्यासाठी कायदेशीर गृह विभाग तसेच इतर कार्यालयांची अधिकृत नोंदणी करून पूर्ण परवानगी प्राप्त झाल्यानंतरच असा व्यवसाय करणे गरजेचे असते; परंतु काही लोक स्वत: काही वर्षे कोल्हापूर, पुणे, मुंबई यांसह विविध जिल्ह्यांमध्ये खासगी सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करून तिच्या अनुभवावर कोल्हापूर शहरामध्ये सुरक्षारक्षक पुरविण्याचे काम करीत असून शासनाचा महसुल बुडवीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार विनापरवाना खासगी सुरक्षारक्षक पुरविणा-या व्यक्ती व कंपन्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी शहरामध्ये अपार्टमेंट, रुग्णालये, कारखाने यांसह इतर विविध ठिकाणी बेकायदेशीर सुरक्षारक्षक पुरविणाºया व्यक्तींची व कंपन्यांची माहिती घेतली असता तिघे
संशयित आढळून आले.या ठिकाणी पुरविले बेकायदेशीर सुरक्षारक्षक या तिघांनी हिराश्री लेक सिटी रंकाळा, वॉटर फ्रंट रंकाळा, मनोहर सृष्टी अपार्टमेंट फुलेवाडी, एव्हरग्रीन अपार्टमेंट नागाळा पार्क, ट्युलिप रेसिडेन्सी, ब्ल्यू बेल अपार्टमेंट कदमवाडी, रॉयल ब्रुर्झ ताराबाई पार्क, खरे मंगल कार्यालय राजारामपुरी, रोटरी कर्णबधिर विद्यालय, एस. एलिट आधार हॉस्पिटल, कोल्हापूर पब्लिक स्कूल, कॅम्प्रो मेटल्स एमआयडीसी कागल, व्होल्टाज कंपनी, शिरोली, सुपरसेल इंडस्ट्रीज शिरोली, अद्वितीय अपार्टमेंट हरिओमनगर, मेट्रो हॉस्पिटल शाहूपुरी, आदी ठिकाणी खासगी सुरक्षारक्षक पुरविले आहेत. ते काढून टाकण्याचे आदेशही पोलिसांनी संबंधित अपार्टमेंट व सोसायट्यांना दिले. अशा बोगस कंपन्यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे.
खासगी सुरक्षारक्षक ठेवून घेणाºया व्यक्तींनी कंपनीने कायदेशीर परवानगी प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही, याची खात्री करूनच सुरक्षारक्षक ठेवावेत.प्रमोद जाधव : निरीक्षक, जुना राजवाडा पोलीस ठाणे.