अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या व कामगार संघटना कृती समितीने पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी पोलीस विभागामार्फत कोणत्याही रॅलीला परवानगी देण्यात आली नव्हती. तरीही शिवसेना जिल्हा शाखेच्यावतीने भवानी मंडपातून रॅली काढली. त्यामुळे विनापरवाना रॅली काढल्याबद्दल जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, विराज पाटील, अभिजित बुकशेठ, मंजित माने, रणजित आयरेकर, हर्षल सुर्वे यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांवर तसेच मिरजकर तिकटी येथून रॅली काढल्याबद्दल मावळा कोल्हापूरचे उमेश पोवार, अमोल गायकवाड, अभिजित भोसले, नामदेव पवार, विनोद साळोखे, आदी १० ते १५ जणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले.
शनिवार पेठेतील शिवसेना कार्यालयापासून रॅली काढल्याबद्दल शहरप्रमुख रविकिरण इंगवले, उमेश रेळेकर, किशोर घाटगे, जयवंत हारुगले, रणजित जाधव, तुकाराम साळोखे, आदी ६० ते ७० जणांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविले.
(तानाजी)